राज्यातल्या ऊस गाळप हंगामावर मोठं संकट, 22 ऑक्टोबरपासून बेमुदत संप नेमक्या मागण्या काय

राज्यातील ऊस गाळप हंगामावर संकटाचे ढग जमा झाले आहेत, राजू शेट्टी यांच्या ऊस दर आंदोलनानंतर आता साखर कामगारही 22 ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.​

महाराष्ट्र राज्यात आगामी ऊस गाळप हंगामाच्या तोंडावर साखर कारखानदारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. (Raju Shetty) ऊसाच्या दरासाठी शेतकरी संघटनांच्या आंदोलनापाठोपाठ आता साखर कामगारांनीही आरपारच्या लढ्याची तयारी दर्शवली आहे. कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 22 ऑक्टोबरपासून राज्यभरातील साखर कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली.

​सांगली येथील ऐतिहासिक वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात कामगारांची महत्त्वाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात ‘महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ’ आणि ‘महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ’ या दोन्ही प्रमुख संघटनांनी एकत्र येत बेमुदत संपाची ही संयुक्त हाक दिली आहे. ‘महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम 1947’ रद्द करण्यात आलेला कायदा पूर्ववत लागू करण्यात यावा, ​कारखान्यांचे पुनर्वसन: बंद पडलेले साखर कारखाने पूर्ववत सुरू करून तेथील कामगारांचे पुनर्वसन करावे,​थकीत वेतन आणि हमीभाव: साखर कामगारांचे थकीत वेतन तात्काळ अदा करावे, (Raju Shetty) तसेच साखरेला योग्य हमीभाव देऊन कामगारांच्या इतर वेतनाचा प्रश्न सोडवावा., ​”मागण्या मान्य होईपर्यंत कारखाना सुरू होऊ देणार नाही”असा इशारा या मेळाव्यात राज्य सरकारला कामागार नेत्यांनी दिला आहे.

राज्य सरकारने आणि कारखाना प्रशासनाने कामगारांच्या रास्त मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. “जोपर्यंत सर्व मागण्या पूर्णपणे मान्य होत नाहीत, तोपर्यंत 22 ऑक्टोबरपासून राज्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही,” असा कडक इशारा तात्यासाहेब काळे यांनी दिला आहे. ​एकीकडे ऊसदरासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असताना, (Raju Shetty) आता कामगारांच्या या संपामुळे राज्यातील साखर उद्योग पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम वेळेत सुरू होणार की नाही, याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : 

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रियकराकडून प्रेयसीला दरीत ढकलून खून प्रियकराला पोलीस कोठडी

पुढील 5 दिवस 5 राशींना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ सूर्य-बुध देणार साथ

पावसाळा संपला, तरी माणगंगेची तहान भागेना नदीपात्र कोरडे ठाक