सीजेपीच्या आंदोलनाला मोठा धक्का दिल्लीत बसला. हेच नाही तर दिल्ली पोलिसांनी त्यांच्याकडून असे काही लिहून घेतले की, पुढील काही दिवस ते काहीच करू शकणार नाहीत. अभिजीत दिपके याच्या करिअरला मोठा झटका बसला.

कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीतील ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलन दिल्ली पोलिसांनी उधळून लावले. सीजेपीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल झाले. (Abhijit Deepke) मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यापूर्वीच दिल्ली विमानतळावरून अभिजीत दिपके, साैरभ दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले. अभिजीत दिपके, साैरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यासह अजिंक्य शिंदे यांच्याकडून पोलिसांनी पीस बॉन्ड सही करून घेतला. त्यातच आता सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश सोशल मीडियावर तूफान चर्चेत आहेत. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेस काटजू यांनी सीजेपीच्या या तिन्ही नेत्यांवर निशाणा साधला. हेच नाही तर यांचे करिअर संपल्याचेही मोठे विधान त्यांनी केले. काटजू यांनी थेट नेहा बोरा हिचे काैतुक केले.
पीस बॉन्डवर सही करण्यास तिने नकार दिल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी म्हटले की, मी नेहा बोरा हिचे खरोखरच काैतुक करतो. मार्कंडेय काटजू यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, कॉकरोच जनता पार्टीच्या टॉप चार नेत्यांनी अभिजीत दिपके,साैरभ दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य रहाणे या सर्वांनी पीस बॉन्डवर सही केल्या.(Abhijit Deepke) यानुसार, हे स्पष्ट झाले की, ते कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात सहभागी होऊ शकत नाहीत.
जर पोलिसांनी म्हटले की, यांनी शांती भंग केली आणि बॉन्ड मोडला आहे तर त्यांना अटक करून जेलमध्ये टाकले जाऊ शकते. काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांनी म्हटले की, (Abhijit Deepke) त्यांच्या या निर्णयाने त्यांचे करिअर संपले आहे. बॉन्ड सही केल्याने त्यांच्या करिअरला धक्का बसला. अभिजीत दिपके यांच्यासह तिनही नेत्यांचे करिअर जवळपास संपले आहे. त्यांनी पुढे म्हटले की, मी फक्त नेहा बोरा हिचे काैतुक करतो. तिने पीस बॉन्डवर सही करण्यास नकार दिला. तिने म्हटले की, शांतीपूर्ण आंदोलन करणे हा तिचा अधिकार आहे. आशुतोष रांका आणि साैरभ दास यांना 50-50 हजारांच्या बॉन्डवर सोडण्यात आले. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी जंतरमंतरवर शिरून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा :
दिवाळीआधीच मोठी खुशखबर धडकणार सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढणार
आनंदाची बातमी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव
आंध्रातील चक्रीवादळाचा कोल्हापूरला तडाखा दुष्काळी जिल्ह्याला दिलासा