अर्णब चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पावसाचा इशारा २८ ते २९ ऑक्टोबर महत्त्वाचे

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावरही जाणवू लागला आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे सरकणाऱ्या या चक्रीवादळामुळे २८ आणि २९ ऑक्टोबरला विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत पावसाचा अधिक प्रभाव जाणवू शकतो. (weather) काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचीही शक्यता आहे. चक्रीवादळाचा थेट तडाखा महाराष्ट्राला बसण्याचा अंदाज नसला, तरी त्याच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागांत पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, अर्णब चक्रीवादळाने सोमवारी (ता. २६) तीव्र चक्रीवादळाचे स्वरूप धारण केले. त्यानंतर त्याची तीव्रता वाढून अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. हे वादळ बुधवारी (ता. २८) सकाळपर्यंत आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनाऱ्यावर बापटला ते विशाखापट्टणमदरम्यान धडकण्याची शक्यता आहे. (weather) त्यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी ११५ ते १२५ किलोमीटर, तर वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी १४० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भात पावसाची शक्यता आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये स्थानिक हवामानानुसार पाऊस किंवा वादळी वातावरण निर्माण होऊ शकते; मात्र सर्व जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज नाही.

  • गडचिरोली : २८ ऑक्टोबरला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता.
  • चंद्रपूर आणि गोंदिया : काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज.
  • भंडारा : २८ ते २९ ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता.
  • नागपूर, वर्धा आणि यवतमाळ : काही ठिकाणी पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.

याशिवाय मध्य महाराष्ट्रातील काही भागांत २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पावसाचा प्रभाव केवळ पूर्व विदर्भापुरता मर्यादित राहील, असे निश्चितपणे सांगता येत नाही. जिल्हानिहाय इशाऱ्यांमध्ये पुढील बदल होऊ शकतात.

अर्णब चक्रीवादळ किती दिवस राहणार अर्णब चक्रीवादळाचा मुख्य टप्पा २८ ऑक्टोबरपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. या दिवशी ते आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतर जमिनीवर पुढे सरकत असताना त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, चक्रीवादळाचा प्रभाव संपल्यानंतरही (weather) त्यातून निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रात पाऊस सुरू राहू शकतो. विदर्भासाठी २८ ऑक्टोबरला अतिजोरदार, तर २९ ऑक्टोबरला काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. ३० ऑक्टोबरपासून विदर्भातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून, त्यानंतरच्या स्थितीसाठी हवामान विभागाच्या पुढील अंदाजांवर लक्ष ठेवावे लागेल.

हेही वाचा : 

देवेंद्र फडणवीस यांचाही गेम होणार होता मनोज जरांगे यांचा आणखी एक अ‍ॅटम बॉम्ब मोठी खळबळ

खुशखबर पीएम किसानचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला मिळणार

संजय राऊत थेट राष्ट्रवादीला भिकारी म्हणाले अचानक हल्ला का