2027चा विश्वचषक खेळण्यासाठी मला गिलला खुश ठेवावं लागेल रोहित शर्मा असं का म्हणाला

रोहित शर्माने नुकतेच एक विधान केले आहे जे शुभमन गिलसंदर्भात आहे. या विधानाची आता मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

रोहित शर्माला २०२७ च्या विश्वचषकात खेळायचे आहे. ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते. (2027 World Cup) त्यामुळे, ते साध्य करण्यासाठी तो कठोर परिश्रम करत आहे. दरम्यान, रोहित शर्माने याबद्दल एक विधान केले आहे. रोहितच्या विधानाची आता खूप चर्चा रंगली आहे. रोहितने गिलबद्दलचे हे विधान त्याच्या शोमध्ये केले आहे. या शोमध्ये त्याला एक प्रश्न विचारला असता त्याने दिलेल्ल्या उत्तराची जोरदार चर्चा सुरु आहे.

रोहित म्हणाला की, मला २०२७ च्या विश्वचषकात खेळायचे आहे, (2027 World Cup) त्यासाठी मला कर्णधार शुभमन गिलला खूश ठेवावे लागेल.” रोहितने हे गंमतीत म्हटले आहे. रोहितला एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले होते. या प्रश्नाला विनोदी पद्धतीने उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला, “दोघेही सध्या भारताचे कर्णधार आहेत. गिल माझा कर्णधार आहे आणि मला २०२७ च्या विश्वचषकात खेळायचे आहे, त्यामुळे मला त्याला खूश ठेवावे लागेल. २०२७ च्या विश्वचषकानंतर जर मला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करायचे असेल, तर मला श्रेयसला खूश ठेवावे लागेल. म्हणूनच मला त्या दोघांची गरज आहे.”

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २२५ धावा करून रोहित शर्मा भारतासाठी दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. न्यूझीलंडविरुद्धही तोच फॉर्म कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेने झाली आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर, भारतीय संघ यजमानांविरुद्ध तितक्याच एकदिवसीय मालिका खेळेल, (2027 World Cup) ज्यात चाहत्यांना रोहित शर्मा तसेच विराट कोहली यांची झलक पाहायला मिळेल. या मालिकेतही हे दोन्ही अनुभवी खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या टी-२० मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर वनडे आणि कसोटी मालिका रंगणार आहे. आता यासाठी विराट आणि रोहित जोरदार सराव करत आहेत.

हेही वाचा : 

देवेंद्र फडणवीस यांचाही गेम होणार होता मनोज जरांगे यांचा आणखी एक अ‍ॅटम बॉम्ब मोठी खळबळ

खुशखबर पीएम किसानचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला मिळणार

संजय राऊत थेट राष्ट्रवादीला भिकारी म्हणाले अचानक हल्ला का