दिवाळीचा सण जवळ येताच बाजारपेठांमध्ये सोने खरेदीची लगबग वाढते. शुभमुहूर्तावर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जात असल्याने अनेक ग्राहक दागिने खरेदी करण्यासाठी सराफांच्या दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. मात्र, सोनं खरेदी करताना थोडीशी निष्काळजीपणाही महागात पडू शकते. (festival of Diwali) त्यामुळे दागिने खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी केवळ हॉलमार्क पाहणं पुरेसं नाही. कारण बनावट हॉलमार्कचा वापर करून ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (festival of Diwali) त्यामुळे दागिन्यांवरील हॉलमार्कसोबतच त्याचा सहा अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) कोड तपासणं आवश्यक आहे. हा कोड प्रत्येक दागिन्याची स्वतंत्र ओळख दर्शवतो.
ग्राहकांना सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) BIS Care या अधिकृत मोबाइल ॲपची मदत घेता येते. या ॲपमध्ये दागिन्यावरील HUID कोड टाकून त्यासंबंधीची उपलब्ध माहिती तपासता येते. (festival of Diwali) त्यामध्ये दागिन्याची शुद्धता, हॉलमार्किंग केंद्र आणि नोंदणीकृत सराफाशी संबंधित तपशील मिळू शकतात.
ॲपमध्ये दिसणारी माहिती प्रत्यक्ष दागिन्यावरील हॉलमार्क आणि दुकानदाराने दिलेल्या बिलाशी जुळते का, हे तपासून पाहा. माहितीमध्ये तफावत आढळल्यास किंवा शंका निर्माण झाल्यास संबंधित सराफाकडून स्पष्टीकरण मागा. गरज भासल्यास BIS च्या अधिकृत यंत्रणेशी संपर्क साधा.
दिवाळीच्या खरेदीत घाई करण्यापेक्षा सोन्याची शुद्धता, दागिन्यावरील हॉलमार्क, HUID कोड आणि खरेदीचे पक्के बिल यांची खात्री करूनच व्यवहार करा. थोडीशी सावधगिरी बाळगल्यास बनावट दागिने खरेदी करण्याचा धोका कमी होऊ शकतो आणि तुमच्या पैशांची सुरक्षितताही राखता येईल.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस यांचाही गेम होणार होता मनोज जरांगे यांचा आणखी एक अॅटम बॉम्ब मोठी खळबळ