भारतीय संघाचे नशीब खराब, सामना जिंकणारच होते पण मग न्यूझीलंडमध्ये घडलं तरी काय

भारतीय संघाला आता खराब हवामानाचा फटका असा बसला की थेट सामना जिंकायची संधी हातातून निसटली. न्यूझीलंडमध्ये नेमके काय घडले ते पाहा

न्यूझीलंडच्या हवामानाने इंडिया ‘ए’ संघाकडून विजयाची संधी हुकली. लिंकन येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात, इंडिया ‘ए’ संघाला विजयासाठी फक्त एक विकेट गमावण्याची गरज होती, परंतु हवामान खराब झाल्यामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. परिणामी, न्यूझीलंड ‘ए’ संघाने सामना अनिर्णित राखला. इंडिया ‘ए’ संघाने न्यूझीलंड ‘ए’ संघासमोर ३१३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडने १८७ धावांत ९ विकेट गमावल्या.(Indian team) त्यानंतर हवामान आणखी खराब झाल्याने सामना थांबवावा लागला.

खराब हवामानामुळे केवळ भारतालाच सामना गमवावा लागला नाही, तर न्यूझीलंडच्या ११ व्या क्रमांकाच्या फलंदाजानेही आपल्या संघाला पराभवापासून वाचवण्यासाठी खेळपट्टीवर शौर्यपूर्ण प्रयत्न केला. ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जेडन लेनॉक्सने २४ चेंडू खेळून ६ धावा केल्या. (Indian team) त्याने आणि कर्टिस हीपीने शेवटच्या विकेटसाठी १७ धावा जोडल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या दोघांनी ५७ चेंडू खेळले. कर्टिस हीपीने १८७ चेंडूंमध्ये नाबाद ९० धावा केल्या.

इंडिया ‘अ’ संघ हा सामना जिंकू शकला नाही. पहिल्या डावात इंडिया ‘अ’ संघ अवघ्या ११३ धावांवर सर्वबाद झाला, पण दुसऱ्या डावात त्यांनी ५१६ धावा करत एक विलक्षण पुनरागमन केले. देवदत्त पडिक्कलने २४८ चेंडूंमध्ये १९९ धावा केल्या. साई सुदर्शननेही ९१ धावा केल्या. यश राठोडने ६६, तर वॉशिंग्टन सुंदरने ५२ धावा केल्या. गोलंदाजी विभागात आकिब नबीने दोन्ही डावांमध्ये मिळून सहा बळी घेत चांगली कामगिरी केली.

आता भारतीय अ संघाला तरी निराशेचा सामना करावा लागला आहे, (Indian team) यामुळे भारतीय संघ जो टी-२० सामना खेळत आहे त्यांनाही हवामानाचा फटका बसतो की काय याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. भारत न्यूझीलंड तिसरा टी-२० सामना खेळत असून नाणेफेक हे भारतीय संघाने जिंकले आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारत मालिकेत आघाडीवर आहे पण हा सामना जिंकले तर थेट पारडे जड होईल.

हेही वाचा : 

देवेंद्र फडणवीस यांचाही गेम होणार होता मनोज जरांगे यांचा आणखी एक अ‍ॅटम बॉम्ब मोठी खळबळ

खुशखबर पीएम किसानचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला मिळणार

संजय राऊत थेट राष्ट्रवादीला भिकारी म्हणाले अचानक हल्ला का