हार्ट अटॅक आणि अन्य गंभीर (heart attack) आजाराची जोखीम कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची चाचणी करणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉलची पातळीला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नियमित एक्सरसाईज, संतुलित आहार आणि फास्टफूड पासून दूर रहावे.

गेल्या काही वर्षात हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढले आहे. हृदय रोगांपासून वाचण्यासाठी डॉक्टर कोलेस्ट्रॉलची चाचणी करण्याचा सल्ला देत असतात. खासकरुन आता ३५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना कोलेस्ट्रॉलची चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि एनएचएलबीआयच्यानुसार (heart attack) काही लोकांमध्ये हृदयाच्या आजाराची रिस्क जास्त असते. वाढलेले कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आजाराचा एक रिस्क फॅक्टर आहे, त्यामुळे वेळीच चाचण्या करणे गरजेचे असते. यामुळे हार्ट अटॅकच्या रिस्कपासून वाचता येते.
दिल्लीच्या मुलचंद हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉडी डिपार्टमेंटचे प्रोफेसर असलेले डॉ.तरुण कुमार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणतात की तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित असणे गरजेचे असते. आता पहिल्यापेक्षा हृदयाच्या आजाराचे प्रमाण जास्त आहे. (heart attack) त्यामुळे बचावासाठी टेस्ट करणे गरजेचे आहे. आता ३५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांनी कोलेस्ट्रॉलची पातळी जाणून घेण्यासाठी लिपिड प्रोफाईल टेस्ट करणे गरजेचे आहे. याशिवाय अनेक दुसऱ्या चाचणी करणे देखील गरजेचे आहे.
कोणत्या लोकांनी करावी कोलेस्ट्रॉलची चाचणी :
ज्या लोकांचे वजन सामान्य पेक्षा जास्त आहे.
डायबिटीजचे रुग्ण
उच्च रक्तदाब, किडनीचे रुग्ण
कुटुंबात हृदयरोगाचा वारसा
धुम्रपान आणि मद्याचे सेवन करणारे लोक
कोलेस्ट्रॉलची पातळी किती असावी :
शरीरात एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी 200 mg/dL हून कमी असायला हवी. 200-239 mg/dL बॉर्डरलाईन आणि 240 mg/dL वा त्याहून जास्त पातळी असल्यास त्यास वाढलेले कोलेस्ट्रॉल म्हटले जाते. याशिवाय एलडीएल 100 mg/dL हून कमी व्हायला हवी. तसेच एचडीएल 40 mg/dL हून जास्त आहे.
कोलेस्ट्रॉलला नियंत्रित कसे ठेवावे :
रोज अर्धा तास एक्सरसाईज जरुर करावे
जास्त तळलेले आणि तिखट खाऊ नये
फास्ट फूड कमी खावे
जास्त तेल खाऊ नये
हेही वाचा :
मोठी बातमी एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीपूर्वी वेतनाचा मार्ग मोकळा
फोनमध्ये SIM नसेल तर WhatsApp बंद होणार का काय होणार नेमका बदल