उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समान नागरी कायद्याबाबत मोठी घोषणा केली आहे. लखनऊ येथे (Amit Shah) आयोजित भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना शाह संबोधित करत होते.

अमित शाह म्हणाले की, देशातील (Amit Shah) अनेक राज्यांमध्ये समान नागरी कायदा आधीच लागू झाला आहे; आता उत्तर प्रदेशच्या जनतेने राज्यात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार सत्तेत आणावे, आम्ही उत्तर प्रदेशातही यूसीसी लागू करू. शाह यांच्या या घोषणेनंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना विचारले असता, त्यांनी “बडी देर कर दी मेहरबाँ आते-आते…” असा खोचक टोला लगावत भाजपवर निशाणा साधला. कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरताना अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. “उत्तर प्रदेशात भाजप म्हणजे अंगदाचा पाय आहे, त्याला कोणीही हलवू शकत नाही. कार्यकर्त्यांनी आता कंबर कसायला हवी आणि अर्जुनासारखी केवळ माशाच्या डोळ्यावर नजर ठेवून कामाला लागायला हवे. आपले ध्येय पुन्हा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करणे हेच आहे,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
जुन्या दिवसांची आठवण करून देताना शाहांनी सांगितलं, २०१४ च्या आधी राज्यात भाजपचे केवळ ४४ आमदार होते आणि सर्वत्र निराशा होती; मात्र मी स्वतः तहसील पातळीपर्यंत जाऊन संघटना मजबूत केली. (Amit Shah) त्याचाच परिणाम म्हणून २०१४ मध्ये ४१ टक्के मतांसह भाजपने उत्तर प्रदेशात ७३ खासदार निवडून आणले. तसेच २०१७ मध्ये नोटाबंदी झाली तेव्हा अखिलेश यादव यांची रात्रीची झोप उडाली होती आणि त्या निवडणुकीत भाजपने ४० टक्के मतांसह ३१२ जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. भाजप उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सत्तेत येणार असून, कार्यकर्त्यांनी मनात कोणतीही शंका अथवा द्विधा बाळगण्याची गरज नाही, असेही शाह यांनी स्पष्ट केले. भाषणाच्या शेवटी अमित शाह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले.
हेही वाचा :
कांदा खरेदी करताना या चुका टाळा अन्यथा पैशांचं होईल मोठं नुकसान
गुड न्यूज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर