बद्रीनाथहून येणारं हेलिकॉप्टर कोसळलं, हेलिकॉप्टरमध्ये 6 जण

सतत कोसळणारा पाऊस आणि दाट ढगांमुळे दृश्यमानता खूप कमी आहे. बचाव मोहिमेतील टीम्स आणि हेलिकॉप्टर्सना शोध घेताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय.

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ धामहून फाटाला जाणारं एक हेलिकॉप्टर कोसळलं आहे. जोशीमठ जवळ हाथी डोंगराच्या मागे चायी गावात जवळ ही दुर्घटना घडली. (helicopters) अजून हेलिकॉप्टरचा ढिगारा सापडलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन टीमने शोध मोहिम सुरु केला आहे. भारत कंपनीचं हे हेलिकॉप्टर असल्याचं सांगितलं जातय. बद्रीनाथ आणि जोशीमठ दरम्यान ही घटना घडली आहे. बद्रीनाथ आणि जोशीमठ दरम्यान ही घटना घडली आहे. हेलिकॉप्टरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लोकेशन मिळत नाहीय समजल्यानंतर हेलिकॉप्टरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु झाले. या मोहिमेत दोन अन्य हेलिकॉप्टर्सनाही लावण्यात आलं.

सतत कोसळणारा पाऊस आणि दाट ढगांमुळे दृश्यमानता खूप कमी आहे. बचाव मोहिमेतील टीम्स आणि हेलिकॉप्टर्सना शोध घेताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. बद्रीनाथ आणि जोशी मठ दरम्यानच्या भागात शोध मोहिम सुरु आहे. हेलिकॉप्टरमध्ये सहालोक असल्याची माहिती आहे. पॅसेंजर मेनिफेस्टनुसार हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा लोक होते. (helicopters) यात चंद्रकांत, राजश्री, दिनेश, आकाश आणि अथर्व अशी या प्रवाशांची नाव आहेत. त्या शिवाय वैमानिकही या हेलिकॉप्टर मध्ये होता. हिंमांशू असं या पायलटचं नाव आहे. ऑक्टोंबर महिन्यात चारधाम यात्रेदरम्यान दोन हेलिकॉप्टर्सची इमर्जन्सी लँडिंग झाली होती. यातली एक घटना रुद्रप्रयागमध्ये खराब हवामानामुळे घडली. टिहरीमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एका हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग करावं लागलेलं.

हेही वाचा : 

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राजकारण तापलं, पडळकरांच्या गटातील मतदाराच्या अपहरणाचा आरोप तिघांवर गुन्हा

कांदा खरेदी करताना या चुका टाळा अन्यथा पैशांचं होईल मोठं नुकसान

गुड न्यूज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर