फरशीवर चिवड्याचा ढिग, त्यावर बसून पॅकिंग व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

चहा असो किंवा नुसता टाईमपास, चिवडा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. गोड, आंबट आणि तिखट चवीचा चिवडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. मात्र, आपण आवडीने खाणारा हा चिवडा नेमका कसा तयार केला जातो, याचा विचार कधी केला आहे का? सध्या सोशल मीडियावर चिवडा तयार करण्यापासून ते पॅकिंग करण्यापर्यंतचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी अस्वच्छता पाहून चिवडा खाणाऱ्यांना धक्का बसला आहे.

व्हिडिओमध्ये चिवडा तयार झाल्यानंतर तो पॅकिंग करण्याची प्रक्रिया दिसत आहे. मात्र, (favorite food) ज्या ठिकाणी चिवड्याचा मोठा ढिग ठेवण्यात आला आहे, तो परिसर अत्यंत अस्वच्छ असल्याचे दिसते. फरशीवरच चिवड्याचा ढिग ठेवण्यात आला असून, त्याच ठिकाणी बसून एक कामगार चिवडा पाकिटांमध्ये भरताना दिसत आहे. कामगाराकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचेही व्हिडिओत दिसते. अशा वातावरणात तयार आणि पॅक होणारे खाद्यपदार्थ ग्राहकांच्या आरोग्यासाठी किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भारतात (favorite food) अनेक ठिकाणी कोणत्याही स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करता खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याची नाराजी काहींनी व्यक्त केली. माणूसच माणसाच्या आरोग्याशी खेळत असून, केवळ पैशांच्या लालसेपोटी ग्राहकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची टीकाही करण्यात आली आहे. लहान-मोठ्या स्तरावर खाद्यपदार्थ तयार करणाऱ्यांनी स्वच्छतेचे नियम पाळणे आवश्यक नाही का? अशा प्रकारे पदार्थ तयार करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

आजही अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. अशा पदार्थांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनीही बाहेरून खाद्यपदार्थ खरेदी करताना सावध राहणे गरजेचे आहे. पाकीटबंद पदार्थ खरेदी करताना उत्पादकाचे नाव, उत्पादनाची तारीख, मुदत आणि पॅकिंगची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तो नेमका कुठला आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. व्हिडिओची स्वतंत्र पडताळणीही झालेली नाही. (favorite food) त्यामुळे कोणत्याही विशिष्ट उत्पादकाबाबत निष्कर्ष काढता येणार नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बाहेरचे खाद्यपदार्थ खाताना स्वच्छतेचा विचार करणे किती आवश्यक आहे, हे नक्कीच लक्षात येते. तुम्ही असा चिवडा खाऊ शकाल का? एकदा विचार जरूर करा

हेही वाचा : 

स्मार्ट मीटर बसवा, नाहीतर लाईट बंद महावितरणकडून २४ तासांचा अल्टिमेटम

कार्डधारकांना फटका एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड

मोठी बातमी शरद पवार रुग्णालयात दाखल, अचानक तब्येत बिघडली