मोदी सरकारविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. मत चोरी, एसआयआरसह इतर मुद्यांवर जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. मोदींसारखा विरोधी पक्षांकडे चेहरा नसल्याचा आरोप करण्यात येत असतानाच जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

देशाच्या राजकारणात विरोधक सत्ता परिवर्तनासाठी मैदानात उतरले आहेत. मत चोरी, एसआयआरसह इतर (controversy) अनेक मुद्यांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत विरोधकांचे आक्रमक सूर उमटत आहेत. निवडणूक आयोगासह इतर अनेक संस्थाविरोधात त्यांनी शड्डू ठोकले आहे. पण मोदींसारखा करिष्माई नेतृत्व विरोधकांकडे नसल्याचा आरोपही होत आहे. मोदींसारखा विरोधी पक्षांकडे चेहरा नसल्याचा आरोप करण्यात येत असतानाच जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांच्यासमोर राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल असे पर्याय देण्यात आले. तेव्हा त्यांनी राहुल गांधी यांचे थेट नाव घेतले.
उमर अब्दुल्ला यांनी महत्त्वाची माहिती दिली. भारतात सध्या खऱ्या अर्थाने केवळ दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत. एक काँग्रेस आणि दुसरी भाजपा. इतर प्रादेशिक पक्षांना अथवा नेत्यांना आपण मोठे राष्ट्रीय नेते असल्याचा भ्रम आहे. पण वस्तुस्थिती वेगळी आहे. आमच्या सारख्या प्रादेशिक पक्षांचा प्रभाव हा केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरता मर्यादित असतो. याउलट राहुल गांधी एका राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व करतात. (controversy) त्यामुळे त्यांना देशभरात एक मोठी ताकद आणि फायदा मिळतो. इतर नेत्यांकडे अशी राष्ट्रीय स्तरावरील ओळख नसल्याचे अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. त्यांनी राहुल गांधी हेच पंतप्रधान पदासाठी विरोधी खेम्यातील योग्य नेते असल्याचे जाहीर केले.
यावेळी उमर अब्दुल्ला यांनी यावेळी राहुल गांधी यांची बलस्थानंही सांगितली. राहुल गांधी यांना राजकारणाची चांगली जाण आहे. त्यांना सामाजिक आणि आर्थिक बाबींची समज आहे. सर्वात उत्तम बाबमध्ये ते थेट लोकांशी संवाद साधतात. (controversy) गेल्या काही दिवसात राहुल गांधी यांचा राजकीय आलेख उंचावला आहे. ते जे मुद्दे घेऊन मैदानात उतरले आहेत. त्यांच्याविषयीची जागरूकताही लोकांमध्ये येत आहे आणि त्यांना जाहीर पाठिंबा मिळत असल्याचा दावा अब्दुल्ला यांनी केला. मी राष्ट्रीय नेता नाही. मी एका भागातील नेता आहे. राहुल गांधी हे एका राष्ट्रीय पक्षाचा भाग आहेत. त्याचा फायदा त्यांना देशभरातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी होतो असे अब्दुल्ला म्हणाले.
हेही वाचा :
स्मार्ट मीटर बसवा, नाहीतर लाईट बंद महावितरणकडून २४ तासांचा अल्टिमेटम
कार्डधारकांना फटका एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड