मुलींवर अत्याचार करणाऱ्याला चीनमध्ये नपुंसक बनवतात, आपल्याकडे असं मकरंद अनासपुरे यांचं वक्तव्य

मकरंद अनासपुरे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत न्यायव्यवस्थेबद्दल भाष्य केलं असून महिलांवर अत्याचार करणाऱ्याला मृत्यूदंड दिला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे अनेकदा सामाजिक तसेच राजकीय घडामोडींवर भाष्य करतात. (Makarand Anaspure) अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत मकरंद यांनी मुलींवर होणाऱ्या अत्याचारांवर आणि आरोपीला योग्य ती शिक्षा न मिळण्याबद्दल भाष्य केलं आहे. मुलीवर अत्याचार करणाऱ्याला मृत्यूदंड दिला पाहिजे, असं मकरंद यांनी म्हटलं आहे.

मकरंद अनासपुरे म्हणाले की, ‘आपल्याकडे एक गुंड म्हणालेला की, ‘भारत हा गुन्हेगारांसाठी नंदनवन आहे. न्यायव्यस्थेतील जो संथपणा आहे. जी सुस्त झाली आहे. ती निश्चितपणे व्यवस्थित करता येऊ शकते आणि ती करायला पाहिजे. दुसरं म्हणजे, ही अशी अमानवी प्रकरणं त्यावर लवकरात लवकर कठीण शासन जर झालं नाही, तर मग त्याचा उपयोग काय, असा प्रश्न निर्माण होतो. कारण, तुम्ही जेवढी दिरंगाई करत जाल, या प्रकरणात तितकं त्याचं धारधारपण कमी होईल. आपल्याकडे दुर्दैव असं आहे की, मुलींवरच्या महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये साधारण 25 ते 27 टक्के शिक्षा झाली आहे. बाकीच्यांना निर्दोष सोडलेलं आहे. (Makarand Anaspure) त्यामुळे, असं होतं की, गुन्हा केला की नाही. दुसरं असं असतं की, ज्यांच्यावर वेळ येते, जिची मुलगी असते, त्या आई–बाबांना काय वाटत असेल? आणि समाज म्हणून आपण ह्याकडे कसं बघतोय, इतर गुन्हे करूनही जर एखादा आरोपी समाजात वावरत असेल, तर आपण कोणाला सांभाळतो आहोत आणि ह्या बाबतीतला न्याय कठोर झालाच पाहिजे.’

‘तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला तात्काळ मृत्युदंड दिला पाहिजे. कारण, बऱ्याच देशांमध्ये अशा आरोपींना मृत्युदंड दिला जातो. अमेरिकेत आजन्म कारावास आहे, चीनमध्ये नपुंसक बनवतात, आपल्याकडे असा काहीच कारभार नाहीये. आपल्याकडे न्यायप्रक्रियेत इतकं लांबत जातं आणि तो जामिनावर सुटलेला आरोपी धनाढ्य असेल तर तो मॅनेज करू शकतो. इतका वेळ तुम्ही का लावता? अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला तुम्ही माणूस म्हणून कसं गृहीत धरता. (Makarand Anaspure) त्यामध्ये कठोरता येणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.’ असं मकरंद अनासपुरे यांनी शेवटी म्हटलं. ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत मकरंद अनासपुरे बोलत होते.

हेही वाचा : 

स्मार्ट मीटर बसवा, नाहीतर लाईट बंद महावितरणकडून २४ तासांचा अल्टिमेटम

कार्डधारकांना फटका एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड

मोठी बातमी शरद पवार रुग्णालयात दाखल, अचानक तब्येत बिघडली