शुक्राच्या वक्री चालीचा पुढील ११ दिवस काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ज्योतिषीय गणनेनुसार, या काळात ५ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासह धन लाभाचे योग निर्माण होतील. कोणत्या आहेत या राशी, जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला सुख, संपत्ती, ऐश्वर्य, प्रेम आणि भौतिक सुखांचा कारक मानले जाते. सध्या शुक्र वक्री अवस्थेत असून, १४ नोव्हेंबरपर्यंत त्याची ही चाल कायम राहणार आहे. शुक्राच्या या वक्री चालीचा पुढील ११ दिवस पाच राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. (zodiac signs) या काळात काहींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासोबतच नोकरी, व्यवसाय आणि नातेसंबंधांमधील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत या ५ राशी आणि त्यांच्यासाठी हा काळ कसा असेल, जाणून घेऊया.
वृषभ
शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी असल्याने या राशीच्या लोकांना त्याच्या वक्री चालीचा चांगला फायदा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामात प्रगतीची संधी मिळेल, तर एखादी चांगली नोकरीची ऑफरही येऊ शकते. व्यावसायिकांना सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. वैयक्तिक नात्यांमधील मतभेदही दूर होण्यास मदत होईल. मात्र, या काळात घाईघाईने कुठेही पैसे गुंतवू नका आणि आर्थिक जोखीम घेणे टाळा.
मिथुन
या राशीच्या लोकांचा कल सुखसोयी आणि चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्याकडे वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. सहकाऱ्यांसोबत काही मतभेद असतील, (zodiac signs) तर ते संवादातून सोडवण्याचा प्रयत्न करा. खर्च करताना बजेटचे भान ठेवा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. काही जणांना पदोन्नतीची संधीही मिळू शकते. कामात लक्ष लागेल आणि व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल जाणवतील. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक नात्यांमध्येही सुधारणा होईल. जुने गैरसमज दूर करण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधा. व्यावसायिकांना जुन्या प्रकल्पातून फायदा मिळण्याची शक्यता आहे.
सिंह
शुक्राच्या वक्री चालीचा सिंह राशीच्या लोकांच्या करिअरवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. कामाचा ताण कमी होऊन प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळू शकते. (zodiac signs) तर सध्याच्या नोकरीतही दिलासा मिळू शकतो. व्यावसायिकांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. कुटुंबातील आणि जवळच्या व्यक्तींसोबतचे संबंध अधिक दृढ होतील.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी पुढील ११ दिवस प्रगतीचे ठरू शकतात. नोकरीशी संबंधित कामांमध्ये सुधारणा होईल आणि रखडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. परदेशाशी संबंधित कामातूनही फायदा मिळू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत. मात्र, पैशांशी संबंधित कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. विनाकारण नकारात्मक विचार करत बसणे टाळा.
हेही वाचा :
शेतकऱ्यांना गोड बातमी अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट
दिवाळीच्या एक दिवस आधीच राज ठाकरे यांचा सर्वात मोठा निर्णय, ट्विट करत म्हणाले
निवडणूक हरताच ट्रम्प लाइनवर आले, भारताला दिलासा देणारी मोठी घोषणा