नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसोबतच सरकारी(gst) तिजोरीशी संबंधित आनंदाची बातमी आली आहे. एप्रिलच्या पहिल्या दिवशी जीएसटी संकलनाचे मोठे आकडे समोर आले आहेत. मार्च महिन्यात जीएसटी संकलन 1.78 लाख कोटी रुपये होते. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये त्यात 11 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
मासिक आधारावर विचार केला तर आतापर्यंतची ही दुसरी मोठी(gst) आकडेवारी आहे. 23-24 या आर्थिक वर्षात 20.14 लाख कोटी रुपये GST संकलन झालं आहे, जे 22-23 च्या तुलनेत 11.7 टक्के अधिक आहे.
मार्च महिन्यातील रिफंडवरील निव्वळ जीएसटी महसूल 1.65 लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 18.4 टक्के वाढ झाली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षातील मासिक आधारावर सरासरी GST संकलनाची गणना केली तर 2023-24 या आर्थिक वर्षात 1.68 लाख कोटी रुपये आहे, जे गेल्या आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये 1.5 लाख कोटी रुपये होते.
हेही वाचा :
सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी, कोल्हापुरात पडसाद?; सतेज पाटील काय म्हणाले?
अमरावतीत होणार तिरंगी लढत! बच्चू कडूंच्या उमेदवारामुळं महायुती की मविआचा होणार गेम?