हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सलग तिसरा पराभवामुळे गुणफलकासमोरचा (Scoreboard)मुंबईचा भोपळा कायम….
बोलायचं झालं तर… मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे…. आणि या हंगामात पण सुरुवातीला ट्रॉफी जिंकण्याची मोठी दावेदार मानल्या जात होती…. पण एकापेक्षा एक नावाजलेले फलंदाज संघात असताना… वानखेडे स्टेडियम मुंबई इंडियन्सचा बालेकिल्ला…. जेथे राजस्थानच्या राजवाड्यांनी सुरुंग लावला….(Scoreboard) आणि या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सलग तिसरा पराभवामुळे गुणफलकासमोरचा मुंबईचा भोपळा कायम राहिला….
हिरवे गवत असलेल्या खेळपट्टीवर नव्या चेंडूवर बोल्ट धोकादायक ठरणार हे निश्चित होते… आणि घडलेही तसेच आऊट स्विंग झालेल्या चेंडूवर रोहित चकला. आणि शून्यावर आऊट झाला. रोहित आऊट झाल्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये सन्नाटा पसरला; पण ही शांतता पुढे जाऊन अधिक धीरगंभीर झाली, कारण बघता बघता मुंबईची अवस्था चार बाद २० अशी झाली….
त्यानंतर अगोदरच प्रेक्षकांचा विरोध सहन करणारा आणि संघाची फारच वाईट अवस्था अशा परिस्थितीत मैदानात येणाऱ्या कर्णधार हार्दिक पांड्याने सहा चौकार मारत ३४ धावा केल्या. त्याने तिलक वर्मासह ३६ चेंडूत ५६ धावांची भागीदारी केली. संघाच्या फलंदाजीला पडलेले मोठे छिद्र बुजवण्याचा प्रयत्न त्याने केला; पण युझवेंद्र चहलच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा त्याचा डाव फसला आणि तो आऊट झाला.
हार्दिकसह डाव सावरणारा तिलक वर्मा पण चहलच्या गुगलीत अडकला. टीम डेव्हिड आणि जेरार्ड कोएत्झी ही फलंदाजांची शेवटची जोडी मैदानात होती; पण त्यांचाही बार फुसका ठरला.
रोहित शर्मासह सुरुवातीचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले तेथून सुरू झालेली पडझड २० षटकांत नऊ बाद १२५ धावांपर्यंत कायम राहिली.
त्यामुळे इतक्या छोट्या धावसंख्येवर मुंबई इंडियन्सला विजय मिळवणे तसे कठिणच; पण एमफाकाने पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वालला बाद करून सुरुवात चांगली करून दिली. त्यानंतर पांड्याने अगोदरच्या सामन्यात केलेली चूक टाळल्या आणि बुमराला दुसऱ्या षटकात बॉलिग दिली. त्याने तीन षटकांत भेदक मारा केला; परंतु विकेट त्याला मिळाली नाही.
पण युवा आकाश मधवालने संजू सॅमसन आणि जोस बटलरची विकेट घेतली; परंतु तोपर्यंत राजस्थानने अर्धशतकाजवळ मजल मारली होती. रियान परागने नाबाद 54 धावांची खेळी साकार केली, आणि राजस्थानने हे माफक आव्हान सहा विकेट आणि २७ चेंडू राखून पार केले आणि सलग तिसरा विजय मिळवला.
हेही वाचा :
धोनीने सिक्स मारला अन् क्लिन बोल्ड झाली ‘मिस्ट्री गर्ल’, थालाची ती दिवाणी कोण?
सर्वांसमोर ऋषि कपूर यांनी रणबीरच्या कानशीलात लागावली; कारण ठरली ‘ही’ धार्मिक चूक
यंदाच्या लोकसभेला आम्ही 16 जागा लढणारच…; एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने दंड थोपटले