लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील आतापर्यंत झालेल्या निवडणुकांना(express entry) अनेक कंगोरे आहेत. पैकी १९९९ मधील निवडणूक वैशिष्टपूर्ण ठरली. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादात भाजपला विजय मिळला आणि या पक्षाची मतदारसंघात एन्ट्री
झाली. मतदारसंघाच्या फेरपुनर्रचनेनंतर २००९ पासून त्यावर भाजपने ताबा मिळविला आहे. त्यामुळे सध्या होऊ घातलेली निवडणूक भाजपसाठी अती प्रतिष्ठेची असेल.
काँग्रेसचे प्राबल्य राहिलेल्या लोकसभेच्या(express entry) धुळे मतदारसंघात १९५७ मध्ये जनसंघातर्फे उत्तमराव पाटील यांना खासदारकीची संधी मिळाली. नंतर भाजपला या मतदारसंघात एन्ट्री
करण्यासाठी तब्बल ४२ वर्षे वाट पाहावी लागली. या पक्षाचे रामदास रूपला गावित यांनी १९९९ मधील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बापू चौरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डी. एस. अहिरे यांचा पराभव करीत विजय मिळविला होता.
देशातील सत्ता संघर्षातून शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी लोकसभा निवडणुका होत्या. तत्पूर्वी, प्रांताधिकारी पदाचा राजीनामा देऊन समाजकारण, राजकारणात आलेले डी. एस. अहिरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यामुळे लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील काँग्रेसची जागा रिकामी झाली. या कालावधीत लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका होत्या. काँग्रेसच्या आग्रहामुळे विधानसभेचे साक्रीतील उमेदवार बापू चौरे यांना लोकसभेची उमेदवारी करावी लागली आणि डी. एस. अहिरे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार झाले.
भाजपने रामदास गावित यांना उमेदवारी दिली. तिरंगी लढतीत श्री. अहिरे यांनी एक कल्पना लढविली. साक्री विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार वसंत सूर्यवंशी यांचे निवडणुकीत चिन्ह खुर्ची होते. पडद्याआडून श्री. अहिरे यांनी लोकसभा निवडणुकीत धुळे तालुक्यातून एका आदिवासी उमेदवाराला उभे केले आणि त्याला खुर्ची हे चिन्ह मिळवून घेतल्याची चर्चा तेव्हा लपून नव्हती.
परिणामी, लोकसभा निवडणुकीच्या बॅलेट पेपरवर काँग्रेसचे उमेदवार चौरे यांचे चिन्ह पंजा आणि त्याखाली अपक्ष आदिवासी उमेदवाराचे चिन्ह खुर्ची आले. त्यामुळे मतदारांनी पंजा आणि खुर्ची, अशा दोन्ही चिन्हांवर शिक्का मारल्याचे काँग्रेस उमेदवाराच्या लक्षात आले. त्यातून १६ हजार मते बाद झाली, श्री. चौरे हे बारा हजार, तर श्री. अहिरे ४४ हजार मतांनी पराभूत झाले.
या दोघांच्या भांडणात भाजपचे उमेदवार गावित विजयी झाले. मत विभाजनामुळे भाजपला या मतदारसंघात एन्ट्री
करता आली. या संधीचे सोने करत भाजपने नंतर २००९ पासून लोकसभेचा धुळे मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे. आता होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपला संधी मिळते किंवा कसे याची सर्वांनाच उत्सुकता असेल.
हेही वाचा :
ईडीचं नो ऑब्जेक्शन! ‘आप’चे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर
तिसऱ्या कार्यकाळात वीज बिल शून्य, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई : PM मोदी
कोल्हापुरात मृतदेहाच्या अंगावरील दागिन्यांची चोरी