देशभरात लोकसभा निवडणुकीचे धूमशान सुरू झालेय. कर्नाटकात(country) दोन टप्प्यांत निवडणुका होणार असून, पहिल्या टप्प्यातील 14 मतदार संघांसाठी अर्ज भरणाही सुरू झालेला आहे. तथापि, कर्नाटकातील उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली, तर कार्यकर्त्यांनी फक्त कार्यकर्ताच बनून राहायचे का, असा प्रश्न पडतो. कारण एकूण 28 मतदार संघांपैकी तब्बल 22 मतदार संघांत राज्यातील मातब्बर नेत्यांचे नातलगच लढत आहेत.
कर्नाटकात काँग्रेसविरुद्ध भाजप-निजद युती अशी दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे 28 मतदार संघांत दोन्ही पक्षांकडून एकूण 56 उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष आणि इतर पक्षांचे अस्तित्व नगण्य. (country)56 पैकी 22 म्हणजेच 40 टक्के उमेदवार मंत्री, माजी मंत्री, खासदार, आमदारांचे कुटुंबीय आहेत. त्यात जर माजी मंत्री ईश्वरप्पा, व्ही. सोमण्णा, वीणा काशप्पनावर यासारखी आणखी काही बंडखोर नेत्यांची नावे समाविष्ट केली, तर नेत्यांच्या नातलगांचे हे प्रमाण तब्बल 50 टक्क्यांवर पोहोचेल!
रंजक बाब अशी, की सर्वाधिक नातलगांना उमेदवारी दिलीय ती काँग्रेसनेच. त्यापाठोपाठ भाजपचा क्रमांक लागतो आणि निजदबाबत तर न बोलताही कुणीही अंदाज लावू शकतो. भाजप-निजद युतीत निजदच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. पैकी दोन जागांवर देवेगौडांचे कुटुंबीय उमेदवार आहेत. (सोबतची यादी पहा). तर देवेगौडांच्या जावयांना भाजपने एका मतदार संघात उमेदवारी दिली आहे. म्हणजेच देवेगौडांचेच तीन नातलग रिंगणात आहेत. कुटुंब कल्याण राजकारणाचे असे आणखी उदाहरण कुठे असेल!
देवेगौडांचे पुत्र माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, नातू प्रज्वल रेवण्णा हे निजदकडून, तर जावई डॉ. सी. एन. मंजुनाथ हे भाजपकडून रिंगणात आहेत. निजदचे अस्तित्व हे देवेगौडा कुटुंबापुरते मर्यादित असल्याची टीका नेहमीच विरोधकांकडून करण्यात येते, ती त्यामुळेच. काँग्रेसने सर्वाधिक 14 मतदार संघांत मंत्री-माजी मंत्र्यांच्या कुटुंबीयांना रिंगणात उतरवले आहे. म्हणजे घराणेशाहीचा आरोप सहन करूनही त्यांनी घराणेशाहीलाच खतपाणी घातलेय. तर भाजपने सहा नेत्यांच्या नातलगांना उमेदवारी दिलीय. म्हणजे आरोप करणारेही फार मागे नाहीत. काँग्रेसचे एकूण 14 विरुद्ध भाजप-निजद युतीचे एकूण आठ उमेदवार अशा या कौटुंबिक उमेदवारांच्या लढती आहेत. परिणामी, कर्नाटकचे राजकारण ठराविकच कुटुंबाभोवती फिरत असल्याचे दिसून येते.
हेही वाचा :
‘धक-धक गर्ल’च्या मधूर आवाजाने लावलं वेड VIDEO व्हायरल
देशातील पहिली 5 स्टार हॉटेल असणारी लग्झरी ट्रेन, सेवेत असणार हॉस्टेस
दोन महिन्यानंतर नारायण राणे तुरुंगात असतील; संजय राऊत यांचा दावा