आज संपूर्ण देशभरात साजरी होणार रमजान ईद

आज ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद (eid)साजरी होणार आहे. मुस्लीम धर्मात रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो.


नवी दिल्ली : दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याच्या प्रकरणात पतंजली आयुर्वेदचे सर्वेसर्वा बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांचा माफीनामा स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला. न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याच प्रकरणात ‘पतंजली आयुर्वेद’तर्फे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून बिनशर्त माफी मागण्यात आली होती. मात्र हा माफीनामा स्वीकारण्यास न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला.(eid)

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल होणार
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारपासून (ता. १२) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाकडून उद्या (ता. ११) अधिसूचना घोषित करण्यात येणार आहे. दरम्यान, बेळगावला जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. तर चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात चिक्कोडी तहसील कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येईल.

काँग्रेसच्या उंडाळकर गटाची आज महत्त्वाची बैठक
कऱ्हाड : सातारा जिल्हा बॅंक, कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समिती, सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालेली फसवणूक या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाच्या कऱ्हाड दक्षिण व उत्तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह कुंभारगाव व तांबवे जिल्हा परिषद गटातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आज (गुरुवारी) आयोजन करण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या अॅड. उंडाळकर गटाची यापूर्वी तीनवेळा झालेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेली बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा :

ग्राहकांना मोठा धक्का! आईस्क्रीम, केक आणि चॉकलेट होणार महाग

सूर्यग्रहण, अमावस्या आणि नरेंद्र मोदींची सभा; उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

सांगली ठाकरेंच्या शिवसेनेकडेच; काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तातडीने बोलावली बैठक