औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची पर्यटन (Tourism)राजधानी म्हणून ओळखले जाते. पानचक्की, मुघलकालीन दरवाजे, सोनेरी महल, वेरुळ अजिंठा लेणी, बुद्ध लेणी अशा विविध पर्यटनस्थळांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत . औरंगाबाद मधील ही पर्यटनस्थळ पाहण्यासाठी परदेशातूनही पर्यटक येतात.
ऐतिहासिक वारसा लाभलेले औरंगाबाद अर्थात छत्रपती(Tourism) संभाजीनगर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. औरंगाबादमध्ये अनके प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत.
औरंगाबादपासून 15 कि.मी अंतरावर व वेरुळजवळच असलेला दौलताबाद किल्ला देखील प्रसिद्ध आहे.
अजिंठा लेणी प्रमाणे वेरूळ लेण्याही प्रसिद्ध आहेत. 1951 साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक घोषीत केले. वेरुळ लेण्यामध्ये हिंदू, जैन आणि बुद्ध अशा तिन्ही धर्माचे शिल्प कोरलेले आहे. अशी ही लेणी देशतील एकमेव लेणी आहे.
अजिंठा लेणी औरंगाबादचे प्रमुख आकर्षण आहे. अजिंठा लेण्या भगवान गौतम बुद्धांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनाची कथा दर्शवितात.
सोनेरी महल हा ऐतिहासिक राजवाडा आहे. हा बुंदेलखंडच्या सरदाराने बांधले होता. औरंगाबादच्या पहारसिंगपुरा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात सोनेरी महाल आहे.
52 दरवाजांचे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. औरंगाबाद हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेला ‘बीबी का मकबरा’ हा महाराष्ट्राचा ताजमहल म्हणून ओळखला जातो. दिल्लीतील ताजमहल प्रमाणेच याची रचना आहे. यामुळेच अनेक पर्यटक याला आवर्जून भेट देतात.
हेही वाचा :
अजितदादा म्हणाले तोंड उघडायला लावू नका
संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान सलग पाचव्या विजयासाठी सज्ज
रानडुकराच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी