इलॉन मस्कचं ‘एक्स’ हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म(user) भारतात काही काळासाठी बंद पडलं होतं. आज सकाळी 10.45 ते 11 च्या दरम्यान एक्सची सेवा ठप्प झाल्याचं दिसून आलं. या काळात कित्येक यूजर्सनी सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पाडला. डाऊनटाईमच्या काळात यूजर्सना पोस्ट करणे, किंवा एखादं पेज ओपन करणे अशा गोष्टींसाठी देखील अडचण येत होती.
भारतातील दिल्ली, जयपूर, लखनऊ, कटक, अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि इतर बऱ्याच शहरांमध्ये(user) सुरुवातीला ही अडचण दिसून आली. कित्येक यूजर्सना लॉग-इन करण्यास देखील अडचण येत होती. डाऊनडिटेक्टर वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकराच्या सुमारास भारतातील सुमारे 500 यूजर्सनी याबाबत तक्रार केली होती.
काही दिवसांपूर्वीच मेटाचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे दोन्ही सोशल मीडिया हँडल्स अशाच प्रकारे डाऊन झाले होते. जगभरातील यूजर्सना लॉगइन करण्यास अडचण येत होती. यावेळी इलॉनने मीमच्या माध्यमातून मेटाला ट्रोल केलं होतं. तसंच कित्येक यूजर्सनी एक्सवर तक्रारी केल्या होत्या. मात्र, आता एक्सच डाऊन झाल्यामुळे यूजर्सनी इलॉन मस्कला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अर्थात, काही मिनिटांमध्येच एक्सची सेवा पूर्ववत झाली.
हेही वाचा :
हा दुसरा ऑरीच वाटतोय; आमिर खानच्या मुलाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
अंपायरवर गिल भडकला, तरीही संजू सॅमसनवर BCCI ची मोठी कारवाई!
कोल्हापूर : गोकुळची पूर्ण ताकद लावतो, अध्यक्षांचा थेट मुख्यमंऱ्यांना फोन