वसुलीचा अजब प्रकार, कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी Loan Appने शेअर केले महिलेचे आक्षेपार्ह फोटो

मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढू लागले आहे, त्यातच आता शहरातील(loan app) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे ब्युटिशिअन म्हणून काम करणाऱ्या महिलेला भयानक घटनेचा सामना करावा लागला आहे. एका Loan Appने या महिलेचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो शेअर केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्या Loan App ने तिचे नग्न आणि मॉर्फ केलेलेे फोटो तिच्या ओळखीच्या लोकांसोबत शेअर केले. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित ब्युटिशिअनने एलटी मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्युटीशिअन असलेल्या या महिलेने संबंधित लोन(loan app) अ‍ॅपवरुन 1 एप्रिल रोजी 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र ते वसूल करण्यासाठी या लोन अ‍ॅपने ब्युटिशिअनचे आक्षेपार्ह अवस्थेतील आणि मॉर्फ केलेले फोटो, त्या महिलेच्या मित्र परिवारातील लोकांना तसेच तिच्या नातेवाईकांना पाठवले.

मुंबईत राहणाऱ्या या महिलेला 1 एप्रिल रोजी Everloan या कर्ज देणाऱ्या अ‍ॅपबाबत माहिती मिळाली. ते 7 दिवसांसाठी कमी व्याजदरात तात्काळ कर्ज देतात.. त्या महिलेला पैशांची गरज असल्याने तिने तिचे फोटो आणि आवश्यक कागदपत्रे अ‍ॅपला पुरवली आणि 10 हजार रुपयांची रक्कम कर्ज म्हणून घेतली. कर्ज फेडण्याची मुदत संपत आली. शेवटच्या दिवशी त्या ब्युटिशअनला कर्ज देणाऱ्या अ‍ॅपकडून फोन आला. तेथून बोलणाऱ्या व्यक्तीने तिला कर्ज फेडण्यासाठी तिच्याकडे फक्त 30 सेकंद शिल्लक राहिल्याची आठवण करून दिली.

त्यानंतर अवघ्या काही क्षणातच ती ब्युटिशअन आणि तिच्या ओळखीच्या 2 लोकांच्या मोबाईलवर त्या महिलेचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो आले. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या मोबाईवर एक मेसेज आला. लवकरच तुझे मॉर्फ केलेले व्हिडिओ तुझ्या ओळखीच्या लोकांशी शेअर केले जातील, असे त्यामध्ये लिहीले होते. पुढे आणखी बदनामी होऊ नये या भीतीने त्या महिलेने कर्ज घेतलेली रक्कम घाईघाईत भरली. पण त्यानंतर तिने थेट पोलिसांत धाव घेत त्यांच्यासमोर सर्व प्रकार कथन करत मदत मागितली.

तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात गुन्हेगारांविरोधात आयपीसी अंतर्गत खंडणी फसवणूक आणि गुन्हेगारी धमकी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा :

हा दुसरा ऑरीच वाटतोय; आमिर खानच्या मुलाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

एक्सची सेवा ठप्प? भारतासह कित्येक देशांमध्ये आउटेज, यूजर्सच्या तक्रारी

अंपायरवर गिल भडकला, तरीही संजू सॅमसनवर BCCI ची मोठी कारवाई!