कोल्हापूर : कोल्हापूरच्या गादीचा आम्ही सन्मान करतो, म्हणूनच शाहू महाराजांनी(stay in) निवडणुकीला उभे राहू नये असं मी म्हणत होतो, आता ते उमेदवार असल्याने त्यांचा पराभव नक्की आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. कोल्हापुरात काँग्रेसचा पराभव होणार हे लक्षात आल्यामुळेच शाहू महाराजांना निवडणुकीला उभं केल्याचा आरोपही मुश्रीफांनी केला.
हसन मुश्रीफ म्हणाले की, शाहू महाराज यांना निवडणुकीला उभे राहू नका असे ऑलरेडी(stay in) आम्ही सांगितले होते. मात्र ते आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांचा पराभव नक्की आहे. कोल्हापूरच्या गादीचा सन्मान आम्ही करत होतो. म्हणूनच आम्ही त्यांना निवडणुकीला उभे राहू नका म्हणत होतो. मात्र काँग्रेसचा तिथं पराभव होणार हे लक्षात आल्यामुळे त्यांनी महाराजांना उभं केलं.
शाहू महाराजांच्या विरोधात तुम्हचा उमेदवार माघार का घेतला नाही असं विचारल्यानंतर ते म्हणाले की, कोल्हापुरात महायुतीतील शिवसेना शिंदेंचा उमेदवार आहे, त्यामुळे आम्ही उमेदवार मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
या आधीही हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराजांनी निवडणुकीला उभे राहू नये अशी विनंती केली होती. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर आरोप प्रत्यारोप होणारच, ते आम्हाला योग्य वाटणार नाही असंही ते म्हणाले होते.
महाविकास आघाडीने कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीसाठी ही निवडणूक अडचणीची ठरल्याचं दिसून आलं. आधी भाजपने या जागेवर दावा केल्याची माहिती होती. पण शाहू महाराजांच्या उमेदवारीनंतर ती जागा शिंदे गटाला देण्यात आल्याची माहिती आहे. त्यातही उमेदवार बदलाची चर्चा सुरू असताना महायुतीकडून पुन्हा एकदा संजय मंडलिक यांनाच संधी देण्यात आली.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांच्यावर वैयक्तिक टीका करताना थेट कोल्हापूरच्या गादीचा इतिहास सांगितला. आताचे शाहू महाराज हे बाहेरचे आहेत, दत्तक असून ते खरे वारसदार नसल्याची टीका करत मंडलिकांनी टीकेची पातळी सोडली होती. अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका झाल्यानंतरही संजय मंडलिकांनी आपली भूमिका सोडली नव्हती.
शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिकांचे पुत्र विरेंद्र मंडलिकांनीही शाहू महाराजांवर टीका केली. महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या शाहू महाराजांनी काय केलंय असा सवालच त्यांनी विचारला. विशेष म्हणजे समरजीत घाडगेंच्या उपस्थितीत त्यांनी हा सवाल विचारला. समरजीत घाडगे हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूरच्या जनक घराण्यातील व्यक्ती आहेत.
हेही वाचा :
एमआयएमचा पाठिंबा शाहू महाराजांना अडचणीचा ठरेल : राजेश क्षीरसागर
कोल्हापुरात टोळीयुद्धाचा भडका! तरुणावर अंदाधुंद गोळीबारासह धारदार शस्त्राने वार
सतेज पाटलांचा मंडलिकांना इशारा; शाहू महाराजांवर व्यक्तिगत टीकेचे धाडस करू नका…