सतेज पाटलांचा मंडलिकांना इशारा; शाहू महाराजांवर व्यक्तिगत टीकेचे धाडस करू नका…

मी अजूनही मंडलिक यांना सूचना करतोय, त्यांनी शाहू महाराज(political consulting firms) यांच्यावर आक्षेपार्ह विधान टाळवेत. त्यांच्यावर बोलण्याचे धाडस करू नये, असा इशारा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी दिला. मिरजकर तिकटी येथील इंडिया आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचार सभेत आमदार सतेज पाटील बोलत होते.

कोल्हापूर लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूकीत शाहू छत्रपतींचा आशीर्वाद(political consulting firms) घेण्यासाठी वाड्यावर गेलेले चालते ,पण २०२४ च्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चालत नाही. हा दुटप्पीपणा बंद झाला पाहिजे, असे सांगतानाच मागील निवडणुकीत अजिंक्यताराच्या किती पायऱ्या आपण भिजवल्या झिजवल्या असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांना करत चांगलेच धारेवर धरलं.

आमदार सतेज पाटील म्हणााले, २००९ च्या निवडणुकीत संभाजीराजे आणि खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याविरुध्द निवडणूक झाली पण खासदार सदाशिवराव मंडलिकाबद्दल निवडणूक प्रचारात कोणीही वाईट शब्द बोलले नाहीत. त्यांच्या वयाचा मान राखला. या निवडणुकीत टीकेची पातळी ओलांडायची नाही, असा निर्णय जिल्ह्यातील नेतेमंडळींनी घेतला होता.

पण, शाहू महाराजांच्या गादीचा मान न ठेवता खासदार मंडलिक टीका करत आहेत. त्यांनी असे धाडस करू नये, अशी सूचना आमदार पाटील यांनी दिली. या वेळी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती, आमदार जयश्री जाधव, मालोजीराजे छत्रपती, शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार, सह संपर्क नेते विजय देवणे, वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाहू छत्रपतींना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन या वेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले. श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, देशात काँग्रेसने विकासाचा पाया घातला. देश स्वातंत्र्य झाल्यावर भाक्रा नानगल, कोयना, कोल्हापूर जिल्ह्यात वारणा, काळम्मावाडी ही मोठी धरणे बांधली.

दहा वर्षांत एकही नवीन धरण आणि विजेसाठी अणुभट्टी बांधलेले नाही. कोल्हापुरात हायकोर्टाचे सर्किट बेंचची उभारणी, पंचगंगा प्रदूषण मुक्ती, युवकांना नोकरीसाठी आयटी पार्क, पर्यटनाला चालना, विमानतळ आणि रेल्वे यंत्रणात सुधारणा, खेळासाठी नवीन क्रीडांगणे या विषयांना प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा :

उमेदवारी माघारीची चर्चा सुरु असतानाच सांगलीत विशाल पाटलांचा मोठा निर्णय!

कोल्हापुरात टोळीयुद्धाचा भडका! तरुणावर अंदाधुंद गोळीबारासह धारदार शस्त्राने वार

एमआयएमचा पाठिंबा शाहू महाराजांना अडचणीचा ठरेल : राजेश क्षीरसागर