कागलकरांनो, वचपा काढण्याची संधी सोडू नका; महाडीकांनी सतेज पाटलांच्या डावपेचावर…

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कागलमध्ये जाऊन पालकमंत्री हसन(opportunity) मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांना उसकवले आहे. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत प्रचारात अत्यंत चुरस निर्माण होत असताना महाडिक यांनी टाकलेला डाव आणि प्रचाराची पद्धत त्यामुळे त्याला आणखी रंगत आली आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यात(opportunity) जाऊन मागील विधानसभा निवडणुकीत सत्ता स्थापनेवेळी मुश्रीफ यांच्यावर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी कसा गेम केला याचा दाखला देत मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांना वचपा काढण्याचे आवाहन केले आहे.

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागल येथे झालेल्या मेळाव्यात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी, कागलकरांनी काहीतरी शिकण्याची गरज आहे. आम्ही नेहमीच सांगत आलो आहे, पण तुम्हाला वाटतंय महाडिक काहीही सांगतात.पण हा व्यक्ती आत्मघातकी आहे, द्वेशी आहे, नेहमी सुद्बुद्धीने वागतो त्याची अनेक उदाहरण आहेत. अशा शब्दात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

2019 साली ज्यावेळी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत गेले. सत्ता स्थापन केल्यानंतर कोल्हापुरचा पालकमंत्री होण्याचा मान कोणाचा होता? असा सवाल करत पाच वर्ष निवडून आलेल्या मुश्रीफांचा होता की दीड वेळा आमदार राहिलेल्या आमदाराचा होता. मुश्रीफसाहेब हे प्रमुख आहेत महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख होते.

कागलकरांनो, वचपा काढण्याची संधी सोडू नका; महाडीकांनी सतेज पाटलांच्या डावपेचावर…

मुश्रीफसाहेब यांना पालकमंत्री मिळू नये, म्हणून त्यांनी काय खटाटोप केलेत ते मला माहिती आहे. मुश्रीफसाहेब कॅबिनेट मंत्री आणि ते राज्यमंत्री असताना सुद्धा पालकमंत्रीपद त्यांनी मिळवले. मुश्रीफसाहेब यांना अहमदनगर ला जावं लागलं. मुश्रीफ साहेबांच्या तोंडातला घास त्याने काढून घेतला. यामुळे कागलकरांनी या गोष्टीचा वचपा काढला पाहिजे त्याची संधी आहे, अशा शब्दात कार्यकर्त्यांना धनंजय महाडिक यांनी आवाहन केला आहे.

हेही वाचा :

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत 

हार्दिक पांड्याला मिळणार का संघात जागा अन्‌ दुसरा यष्टिरक्षक कोण?

महाराष्ट्र हा भटक्या आत्म्याची शिकार! मोदींचे अंधश्रद्धाळू वक्तव्य