लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष(room) लागले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेससोबत एकत्र प्रचार करत आहे. या दरम्यान शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीच्या बाहेर काढल्याचा दावा महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते जितेन गजारिया यांनी केला आहे. त्यांनी याबाबतचा व्हिडिओ X वर ट्विट केला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे एका खोलीत(room) दिसत आहेत. हा व्हिडिओ केवळ 12 सेंकदाचा आहे. त्यात उद्धव ठाकरे शरद पवार यांना नमस्कार करताना दिसत आहे. त्यानंतर शरद पवार त्यांना काहीतरी बोलल्यावर ते प्रतिक्रिया देऊन बाहेर जात आहे. यासंदर्भात जितेन गजारिया यांनी दावा केला आहे की, शरद पवार यांनी विनम्रतापूर्वक उद्धव ठाकरे यांना बाहेर जाण्याचे म्हटले आहे. कारण ते व्यस्त आहेत. हा व्हिडिओ ट्विट करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासोबत असा व्यवहार करत आहे.’
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजर्सने म्हटले आहे की, काय दिवस आलेय…शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना बाहेर वाट पाहण्याचे म्हटले आहे.
दुसरा म्हणतो, हे काहीच नाही. पुढे पाहा उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवार काय करणार. आणखी एक युजर्सने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, राज्यातील प्रत्येक मतदाराने हा व्हिडिओ पाहावा.
शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. त्यात शरद पवार म्हणतात, उद्धव ठाकरे यांनी फक्त दोनवेळा मंत्रालयात जाणे हे आमच्या फारसे पचनी पडणारे नव्हते. राज्याच्या प्रमुखाला राज्यातील घडामोडींची बितंबातमी माहिती हवी.
कुठे काय घडतेय त्यावर त्यांचे बारीक लक्ष हवे. अनुभव नसल्याने हे सगळे घडत होते तरीही हे टाळता आले असते, असेही शरद पवार यांनी या पुस्तकात म्हटले आहे.
हेही वाचा :
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आम. आवाडे यांच्यात गुफ्तगू…!
नितीन गडकरी अंबाबाई चरणी; नेमकं काय घातलं साकडं?
प्रियांका चोप्रा हिच्या नवऱ्याची प्रकृती चिंताजनक, व्हिडीओ व्हायरल