आमदार रोहित पवारांना तातडीने अटक करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे(political news) आमदार रोहित पवार यांना तातडीने अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे. अजून किती गुंड राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी सोडले आहेत, याची चौकशी निवडणूक आयोग व गृह खात्याने करावी, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

बारामती(political news) लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाने पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप केले, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. “बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस… यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय”, अशी पोस्ट रोहित पवारांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून केली आहे.

“यामध्ये भोर तालुक्यातील ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत… यासाठीच पाहीजे होती का ‘Y’ दर्जाची सुरक्षा?” असा सवाल देखील आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे.

“वेल्हेतील जिल्हा मध्यवर्ती बँक ही रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होती. मतदान असल्याने कदाचित बँका सुरू आहेत”, असे म्हणत रोहित पवारांनी थेट निवडणूक आयोगाला सवाल केला आहे. दरम्यान, रोहित पवार यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

“रोहित पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघात रडीचा डाव सुरु केला. नेहमी कट, कारस्थान करणाऱ्या रोहित पवार याना तात्काळ अटक करून अजून किती गुंड राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी सोडले आहेत, याची चौकशी निवडणूक आयोग व गृह खात्याने करावी”, अशी मागणी सूरज चव्हाण यांनी केली आहे.

दुसरीकडे रोहित पवार यांनी केलेले आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावले आहेत. “मी ७ विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. पण, आजपर्यंत असे मी कधी केले नाही आणि यापुढेही करणार नाही. कारण नसताना विरोधकांमधील काही बागलबच्चे असे धांदत आरोप करत आहे. मी त्याला महत्त्व देत नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

 चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार?

कोल्हापूर, हातकणंगलेत अंडरकरंटचा झटका? 30 दिवसाच्या मेहनतीवर दीड दिवसांत पाणी

मोदींनी तुमच्या-आमच्या सारख्यांच्या खिशातून पैसा घेतला अन् अदानी, अंबानीला…