दोन दिवसातून राजकारण सोडून संन्यास घ्यायचा ,कल्याण सोडून(politics) निघून जायचे , नाहीतर संपवून टाकेन अशी धमकी दिल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विजया पोटे असे या महिला पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन दिवसातून राजकारण(politics) सोडून संन्यास घ्यायचा ,कल्याण सोडून निघून जायचे , नाहीतर संपवून टाकेन अशी धमकी दिल्याचा आरोप शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने केला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकारी असलेल्या विजया पोटे व त्यांचे पती अरविंद पोटे यांनी नुकताच ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता.
या पक्षप्रवेशानंतर अरविंद पोटे यांना ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनंतर मानपाडा पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळ हरदास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
तर दुसरीकडे याप्रकरणी बाळ हरदास यांनी पोटे यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, खोटे आहेत, मी कुणालाही धमकी दिली नाही धमकी देण्याचा त्यांचा काम आहे असे स्पष्टीकरण दिले आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
निकालाआधीच लागले विजयाचे बॅनर; कोल्हापूरचा पॅटर्नच वेगळा…
कोल्हापूर : ‘भावी’ नगरसेवक प्रचारात राबला, लीड दिलं; आता उमेदवारीचे वेध…
ब्रेंकिंग! संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल; भाजप नेत्यांकडून अटकेची मागणी