जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक(down) इतक्या प्रतिष्ठेची आणि चर्चेची बनली आहे. राज्यातील राजकारणात झालेली उलथा-पालथ, महायुतीच्या उमेदवारांबाबत असलेली नाराजी, आणि महाविकास आघाडीतून समोर आलेले तुल्यबळ उमेदवार यामुळे यंदाची निवडणूक तितकीच महत्वपूर्ण बनली आहे.
दोन्हीही मतदारसंघात तुल्यबळ लढत होत(down) असताना प्रत्यक्षात मतदानात मात्र कार्यकर्त्यांमध्ये अजूनही तितकीच इर्षा आणि उमेदवारा प्रती असलेली निष्ठा पाहायला मिळत आहे. गावागावातील गल्ली, चौक, पार आणि चावडीवर कोणता उमेदवार निवडून येणार याचीच चर्चा रंगली आहे. केवळ चर्चा रंगली नाही तर पाचशे रुपयांपासून ते एक लाखांपर्यंत पैजा एकमेकांच्या कार्यकर्त्यांनी लावल्या आहेत. पण प्रत्यक्षात 4 जूनलाच या कार्यकर्त्यांचे पितळ उघड पडणार आहे हे नक्की.
जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक इतक्या प्रतिष्ठेची आणि चर्चेची बनली आहे. राज्यातील राजकारणात झालेली उलथा-पालथ, महायुतीच्या उमेदवारांबाबत असलेली नाराजी, आणि महाविकास आघाडीतून समोर आलेले तुल्यबळ उमेदवार यामुळे यंदाची निवडणूक तितकीच महत्वपूर्ण बनली आहे.
दोन्हीही मतदारसंघात तुल्यबळ लढत होत असताना प्रत्यक्षात मतदानात मात्र कार्यकर्त्यांमध्ये अजूनही तितकीच इर्षा आणि उमेदवारा प्रती असलेली निष्ठा पाहायला मिळत आहे. गावागावातील गल्ली, चौक, पार आणि चावडीवर कोणता उमेदवार निवडून येणार याचीच चर्चा रंगली आहे. केवळ चर्चा रंगली नाही तर पाचशे रुपयांपासून ते एक लाखांपर्यंत पैजा एकमेकांच्या कार्यकर्त्यांनी लावल्या आहेत. पण प्रत्यक्षात 4 जूनलाच या कार्यकर्त्यांचे पितळ उघड पडणार आहे हे नक्की.
अशातच काही हौशी कार्यकर्त्यांनी आपलाच नेता निवडून येणार असा छातीठोकपणे दावा 500 पासून ते लाखांपर्यंत पैजा लावल्या आहेत. इतकेच नव्हे तर महाविकास आणि महायुती सोबत कोण कोणते नेते आहेत त्यांच्या विधानसभा मतदारसंघात कोणाला किती मताधिक्य मिळेल याचेही अंदाज बांधले जात आहेत.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसचे, तर उर्वरित तीन मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख नेते कोणासोबत होते, त्यांनी प्रत्यक्ष काम केले का नाही? जे सुरुवातीला एका बाजूने होते, त्यांनी अंतिम टप्प्यात कुणाचे काम केले ? यासारखी माहिती एकत्रित करून विजयाचे गणित मांडले जात आहे.
हेही वाचा :
निकालाआधीच लागले विजयाचे बॅनर; कोल्हापूरचा पॅटर्नच वेगळा…
कोल्हापूर : ‘भावी’ नगरसेवक प्रचारात राबला, लीड दिलं; आता उमेदवारीचे वेध…
ब्रेंकिंग! संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल; भाजप नेत्यांकडून अटकेची मागणी