विराटने सलामीला उतरावे, सौरभ गांगुलीने दिला सल्ला

विराट कोहलीचा आयपीएलचा फॉर्म पाहाता आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये(t 20 world cup) त्यानेच हिंदुस्थानसाठी सलामीला उतरावे, असा सल्ला हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने दिला आहे. या आयपीएलमध्ये विराटच्या स्ट्राइक रेटबद्दल काहींनी टीका केली होती, पण सध्या त्याचा स्ट्राईक रेट 153.51 आहे जो त्याच्या कारकीर्दीच्या स्ट्राइकपेक्षा खूप जास्त असल्याचेही गांगुलीने सांगितले.

विराट सध्या ज्या फॉर्मात आहे, त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. काल रात्री त्याने 92 धावांची वेगवान खेळी करत आपण टी-20 वर्ल्ड कपला(t 20 world cup) सलामीला उतरायला सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. त्याच्या मागील काही सामन्यातील खेळ्याही लाजवाब होत्या. त्यामुळे आयपीएलला सलामीला उतरणारा विराट कोहली वर्ल्ड कपमध्येही सलामीलाच उतरायला हवा. हिंदुस्थानी निवड समितीने टी-20 वर्ल्ड कपसाठी एक संतुलित संघ निवडला आहे. हा संघ 17 वर्षानंतर हिंदुस्थानला पुन्हा एकदा जगज्जेतेपदाचा मान मिळवून देऊ शकतो. 2007 साली दक्षिण आप्रैकेत झालेल्या पहिल्या-वहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने जगज्जेतेपद पटकावले होते.

हिंदुस्थानचा तगडा संघ
निवड समितीने खरोखरच एक तगडा संघ निवडला आहे. यात फलंदाजीसह गोलंदाजीही खोलवर आहे. जगातील सर्वोत्तम गोलंदाज बुमरा आपल्या संघात आहे. कुलदीप, युझवेंद्र आणि सिराज हे अनुभवी गोलंदाज आहेत. त्यामुळे आपला एक अप्रतिम संघ असल्याचेही गांगुली म्हणाला.


250 धावांचे आव्हान पुढेही कायम
यंदा आयपीएलमध्ये 250 धावांचे आव्हान सहजगत्या पार पाडले जात आहे. हा धमाका पुढे कायम राहिल आणि इतक्या मोठया धावसंख्येचा पाठलाग संघ सहज करतील. आता हा खेळ ताकदीचा खेळ बनला आहे. आता फक्त फलंदाजांना येऊन फक्त गोलंदाजीला पह्डून काढायचे आहे. हिंदुस्थानातील खेळपट्टयाही फलंदाजांनी पोषक अशा आहेत. त्यातच आपल्या मैदानातील बाऊंड्रीजही छोटया आहेत. त्यामुळे 250 धावा सहज झाल्या आहेत. पुढेही हीच ताकद टी-20 वर्ल्ड कपमध्येही दिसेल, अशी आशाही त्याने व्यक्त केली.

हेही वाचा :

इचलकरंजी येथील पंचगंगेतील गाळ काढण्यासंदर्भात होणार लवकरच कार्यवाही!

कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; ‘या’ जिल्ह्यात लवकरच कोसळणार

मी कुठल्या पाटलाच्या मागे हे 4 जूनला समजेल : विश्वजीत कदमांनी सांगलीचे पत्ते उघड केले