गुजरातचा चेन्नईला धक्का, गिल-सुदर्शनची विक्रमी शतके

सलामीवीर शुबमन गिल आणि साई सुदर्शन जोडीने विक्रमी वैयक्तिक शतके झळकावत केलेली 210 धावांची विक्रमी भागी गुजरातला प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पुरेशा ठरल्या. गिल-सुदर्शनने ठेवलेले 232 धावांचे आव्हान चेन्नईला(csk) पेलवले नाही. गुजरातने 35 धावांनी विजय नोंदवत आयपीएलच्या प्ले ऑफची चुरस आणखी तीव्र केली. आयपीएलचे शेवटचे 11 सामने शिल्लक असून अद्याप एकही संघ प्ले ऑफ गाठू शकलेला नाही.

गिल-सुदर्शनने आयपीएलच्या इतिहासातील 210 धावांच्या के. एल. राहुल आणि क्विंटन डिकॉकच्या 2019 साली केलेल्या नाबाद 210 धावांच्या सलामीची बरोबरी साधली. तसेच आयपीएल इतिहासात दुसऱयांदाच दोन्ही सलामीवीरांनी शतके झळकावली. (csk)

याआधी 2019 सालीच हैदराबादच्या जॉनी बेअरस्टॉ आणि डेव्हिड वॉर्नरने हा पराक्रम केला होता. आज दोन्ही सलामीवीरांना विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सचा 229 धावांच्या विक्रमी भागीलाही मागे टाकण्याची संधी होती, पण ती हुकली. एवढेच नव्हे तर एका आयपीएलमध्ये सर्वाधिक 14 चौदा शतकांची विक्रमही 2024 ने नोंदवला.

गुजरातच्या 232 धावांचा पाठलाग करताना 10 धावांत आघाडीचे तिन्ही फलंदाज बाद झाल्यामुळे चेन्नई अडचणीत सापडली. पण डॅरिल मिचेल (63) आणि मोईन अलीने (55) ने 109 धावांची भागी रचत चेन्नईचे आव्हान जिवंत ठेवले, पण ही जोडी फुटल्यानंतर शुभम दुबे आणि रवींद्र जाडेजासुद्धा लवकर बाद झाले आणि चेन्नईने सामना गमावला. आठव्या क्रमांकावर आलेल्या धोनीने तीन षटकार ठोकत 26 धावा केल्या, पण तोपर्यंत गुजरातने विजय निश्चित केला होता. आजच्या विजयामुळे अव्वल आठही संघांसाठी प्ले ऑफचे दार उघडले आहे.

हेही वाचा :

 ऍम्ब्युलन्स खरेदी कंत्राट मिंधे सरकारच्या अंगलट

सैनी सरकार काँग्रेसने पाडावे, आम्ही मदतीला तयार

दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील