मोठ्याचं पोरगं एवढीच भाजपा उमेदवाराची गुणवत्ता, बाळासाहेब थोरात टीका

महायुतीच्या उमेदवाराने पाच वर्षांच्या खासदारकीच्या(mp) कार्यकाळात काय काम केले? किती फिरले? किती वेळा मतदारसंघात आले? कोणते प्रश्न सोडविले? त्यांनी काहीच काम केले नाही. ‘मोठय़ाचं पोरगं आहे, पैसा भरपूर आहे, सत्तेची ताकद आहे, म्हणून खासदार व्हायचंय,’ यापेक्षा कोणतीही गुणवत्ता त्यांच्याकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे, अशी टीका काँग्रेस नेते-आमदार बाळासाहेब थोरात यांनी डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ तिसगाव येथे आयोजित सभेत थोरात बोलत होते. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, नसीर शेख, मुन्ना तांबोळी, शिवशंकर राजळे, रफीक शेख, इलियास शेख, संजय मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.(mp)
बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘तुमच्या पुढे दोन उमेदवार आहेत. एकाकडे खूप धनसंपत्ती आहे, सत्ता आहे; तर दुसरा आहे तो सर्वसामान्य कुटुंबातला कर्तृत्ववान उमेदवार आहे. साध्या कुटुंबातून आलेल्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे, असा माझा तुम्हाला आग्रह राहील. गरिबाच्या पोराला संधी मिळणे सोपे नसते. मात्र, नीलेश लंके यांनी ती मिळविली आहे,’ असे थोरात म्हणाले.


हेलिकॉप्टरवाले झाडाखाली जेवत नसतात!

– नगर-पाथर्डी रस्ता झाल्यानंतर ते कामाच्या ठिकाणी गेले. झाडाखाली जेवायला बसले. मात्र, झाडाखाली आम्हीच बसू जाणे! हेलिकॉप्टरवाले कधी झाडाखाली जेवत नाहीत. कुणी कुणाचे काम करू शकत नाही. नीलेश लंके रोडवरही बसू शकतो, वाहतुकीची कोंडी दूर करू शकतो. ते तुम्हाला जमणार नाही. त्यांना फक्त फुकटचे श्रेय घेण्याची सवय लागली असल्याचा टोला नीलेश लंके यांनी सुजय विखे यांना लगावला.

हेही वाचा :

महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस !

लोकसभा निवडणूक प्रचारात “व्यवस्थे”वरच संशय व्यक्त

कोल्हापुरातील ‘या’ दोन उमेदवारांना आयोगाची नोटीस; निवडणुकीचा खर्च अमान्य