मोबाईल गेमर्ससाठी आनंदाची बातमी! Microsoft जुलैमध्ये स्वतःचे मोबाईल गेम स्टोर लाँच करणार

टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट ही आघाडीची कंपनी असली तरी मोबाईल (microsoft)गेमिंगमध्ये मात्र थोडी मागे आहे. त्यामुळे कंपनी हा नवीन स्टोर लाँच करून मोबाईल गेमर्सना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनी जुलै महिन्यात स्वतःचा वेब-आधारित मोबाईल गेम स्टोर लाँच करणार असल्याची घोषणा ची अध्यक्षा सारा बॉण्ड यांनी केली आहे.

या नवीन स्टोरमध्ये मायक्रोसॉफ्टच्या(microsoft)गेम स्टुडिओंच्या अनेक गेम्स असतील, असे सांगण्यात आले आहे. यात लोकप्रिय कँडी क्रश सागा आणि कॉल ऑफ ड्यूटी मोबाइलसारखे गेम समाविष्ट असतील. तसेच, वेब-आधारित असल्याने हा स्टोर कोणत्याही अँपच्या मर्यादेत न अडकता सर्व डिवाइसेसवर आणि सर्व देशांमध्ये उपलब्ध असेल.

या स्टोअरच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट गेमच्या इन-गेम खरेदींवर सूट देखील देऊ शकते, अशी शक्यता आहे. कारण, अँप स्टोर्स जसे की गूगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर थोड्या थोडक्या गेमवर 30 टक्केपर्यंत कमिशन घेतात.

त्यामुळे मायक्रोसॉफ्ट थेट विक्रीद्वारे थोडी जास्त सूट देऊन गेमर्सना आकर्षित करू शकेल. भविष्यात गुगल आणि ऍप स्टोअरला टक्कर देणारा स्वतंत्र ऍप स्टोर ठरू शकतो.

हेही वाचा :

ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, शिंदे गटात प्रवेश करा अन्यथा…

हेलिकॉप्टरने एंट्री, कॉलर उडवून फ्लाईंग किस, पंकजा मुंडेंच्या सभेत उदयनराजेंची फुल्ल हवा

OYO हॉटेल्स बंद पाडणाऱ्या भाजप आमदाराच्या ऑफिसबाहेरच कपल्सचा रोमान्स? Video Viral