तमाम क्रिक्रेट (cricket) प्रेमींना सांगण्यास दु:ख होत आहे की, इंग्लंडचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसन याने टेस्ट क्रिकेट (cricket) मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऍशेसमध्ये ज्या अँडरसनची बॉलिंग पाहण्यासाठी लोक वेडेपिसे व्हायचे, तोच जेम्स अँडरसन आता आपल्याला पांढऱ्या सदऱ्यात मैदानात धाव घेताना दिसणार नाहीये. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर जेम्स अँडरसन आपल्या 21 वर्षांच्या लांबलचक करियरला रामराम ठोकेल. जेम्स अँडरसनने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली.
काय म्हणाला जेम्स अँडरसन?
माझ्या लहानपणापासून मला आवडलेला खेळ खेळताना माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करताना ही अविश्वसनीय 20 वर्षे गेली आहेत. मी इंग्लंडसाठी बाहेर फिरायला खूप मुकणार आहे. पण मला माहीत आहे की बाजूला पडण्याची आणि इतरांना त्यांच्या स्वप्नांची जाणीव करून देण्याची वेळ योग्य आहे, कारण यापेक्षा मोठी भावना नाही. डॅनिएला, लोला, रुबी आणि माझ्या पालकांच्या प्रेमाशिवाय आणि समर्थनाशिवाय मी हे करू शकलो नसतो. त्यांचे खूप खूप आभार, अशा भावना जेम्स अँडरसनने व्यक्त केल्या आहेत.
तसेच, ज्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांना हे जगातील सर्वोत्कृष्ट काम केले आहे त्यांचे देखील आभार… मी पुढे असलेल्या नवीन आव्हानांसाठी उत्सुक आहे, तसेच माझे दिवस आणखी गोल्फने भरले असेल. वर्षानुवर्षे मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार, माझा चेहरा अनेकदा दाखवत नसला तरीही याचा अर्थ नेहमीच खूप असतो, असं म्हणत जेम्स अँडरसनने भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, वय वर्ष 43 असताना देखील अँडरसनच्या विकेट्स भूक कधी कमी झाली नाही. इंग्लंड असो वा वेस्ट इंडिज, कोणत्याही मैदानात अँडरची स्पीड काही कमी झाली नाही. ना कधी थकला ना थांबला. धावत राहिला अन् खोऱ्याने विकेट्स नावावर करत गेला. ढेरी घेऊन फिरणाऱ्या विशीतल्या तरुणाला देखील लाजवेल, अशी अँडरसनची फिटनेस.. अनेक खेळाडू चाळीशीत आले की पायाला पट्टया लावून फिरतात. मात्र, रखरखत्या उन्हात फलंदाजांचे दांडके मोडण्याची ताकद आहे ती फक्त जेम्स अँडरसनकडेच..!
हेही वाचा :
सांगलीत संजयकाका जिंकणार, अजितदादांना चार जागा सुद्धा मिळणार नाहीत, अभिजीत बिचुकलेंचे धडाकेबाज अंदाज
OYO हॉटेल्स बंद पाडणाऱ्या भाजप आमदाराच्या ऑफिसबाहेरच कपल्सचा रोमान्स? Video Viral
‘आम्ही घर, पक्ष फोडत नाही फक्त संधी मिळाली तर…’ फोडाफोडीच्या राजकारणावर काय म्हणाले फडणवीस?