मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या(candidate) पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबईतील ईशान्य मुंबईतील निवडणूक भाजप आणि ठाकरे गटाने प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीच्या आचारसंहितेला दोन दिवस बाकी असताना, ठाकरे गटाने मुलुंडमध्ये शुक्रवारी भाजप वॉररुममध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजप आणि ठाकरे कार्यकर्ते भिडले होते. या प्रकरणी आज पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. त्यांनंतर या प्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.
मुलुंडमधील ठाकरे गटाने ईशान्य मुंबईतील भाजपचे उमेदवार(candidate) मिहिर कोटेचा यांच्या वॉर रुममध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले. त्यांनी कोटेचा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच शुक्रवारी पैसे वाटपाच्या आरोपावरून शिवसैनिकांनी कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
मुलुंडमधील या राड्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केला. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी आयोगाने गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात पाच शिवसैनिकांना अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि दंगल माजवल्या प्रकरणी अटक केली आहे.
संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. ‘काल मुलुंडमध्ये पैसे वाटप करत असताना आम्ही त्यांना पकडून दिले. मात्र त्यांना बचाव करण्यासाठी स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आले. काळा पैसा पकडून दिला तर आमच्यावरच कारवाई केली, असा आरोप राऊतांनी केला.
हेही वाचा :
शाहरुख खानने सर्वांना मारली मिठी, पण हिजाबमधील तरुणीला पाहिल्यानंतर… video
मायक्रोसॉफ्ट वापरकर्ते सतर्क राहा! सरकारने दिलाय ‘या’ असुरक्षेचा इशारा