भारत सरकार नेहमीच महिलांसाठी नवनवीन योजना(pregnant) राबवत असते. भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभिनयाने जननी सुरक्षा योजना सुरु केली आहे. ही योजना नवीन माता आणि नवजात बालकांसाठी आहे. आई आणि नवजात बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी करणे हे या योजनेमागचे उद्दिष्ट आहे.
या योजनेअंतर्गत गरीब गर्भवती(pregnant) महिलांना नोंदणीकृत आरोग्य संस्थामध्ये प्रसूतीसाठी जाण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. त्या महिलांना प्रसूतीच्या खर्चासाठी पैसे दिले जातात. प्रसूतीच्या दरात वाढ झाल्याने मुलांना आणि आईला योग्य पोषण मिळत नाही. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देषाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने २००५ साली ही योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत गरोदरपणात मुलांची काळजी घेण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या योजनेत गरीब गर्भवती महिलांना ६ हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत देशातील लाखो महिलांनी या योजनेचा फायदा घेतला आहे.
या योनेत गरोदर महिलांची सरकारी किंवा खासगी रुग्णालयात प्रसुती झाल्यावर पैसे मिळतात. योजनेत गर्भवती महिलांना १,४०० रुपये, शहरी भागात राहणाऱ्या महिलांना १००० रुपये आणि मातृ वंदना योजनेअंतर्गत ५ हजार रुपये मिळतात. जेणेकरुन महिला आणि त्यांच्या बाळांचे पोषण चांगले होईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलेचे वय १९ वर्षांपेक्षा जास्त असणे गरजे आहे. देशातील गरीब महिला या योजनेसाठी पात्र असतील. ज्या महिलांची प्रसूती सरकारी रुग्णालयात किंवा घरी होते, त्यांनाच या योजनेचा फायदा होतो. जननी सुरक्षा योजना दोन मुलांपर्यंतच लागू असेल. या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांना सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जाऊन नोंदणी करावी लागेल.
हेही वाचा :
कोल्हापूर लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; सट्टाबाजारात उलाढाल जोरात
“एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले…” थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा
मुंबईत मोठा गोंधळ, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; शिवसैनिक आक्रमक