कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा जोरदारपणे सुरू असताना,डिजीटल पोस्टर माध्यमातून सेना आणि मनसेच्या युतीचे ढोल वाजवले जात असताना गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांनी हॉटेल ताज लँड मध्ये भेट घेवून तासभर चर्चा केली. अर्थात ही चर्चा मुंबईतील हवामान या विषयावर नक्कीच झालेली नाही. या दोघांमधील चर्चा ही पूर्णपणे राजकीय(politics ) होती आणि आहे याबद्दल कोणाचेही दुमत असायचे कारण नाही. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असावी. कारण मुंबई महापालिकेची उद्धव ठाकरे यांच्या हाती असलेली तिजोरीची किल्ली भारतीय जनता पक्षाला त्यांच्याकडून काढून घ्यायची आहे आणि त्यासाठीच राजकारणातील हा “चोर खेळ”असल्याचे म्हणता येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुरुवारच्या शेड्युलमध्ये राज ठाकरे भेट नव्हती. किंवा ती लपवून ठेवली असावी. ती पूर्वनियोजितही असली पाहिजे. कारण दोघांनीही एक तासापेक्षा अधिकचा वेळ या भेटीसाठी दिला होता. या भेटी वेळी दोघात तिसरा नव्हता. गोपनीयता पाळून झालेली भेट”मीडिया'”च्या कॅमेऱ्यातून सुटली नाही. राजकारणातील (politics )या”चोर खेळां “विषयी गुरुवारी दिवसभर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. विमान दुर्घटना घडली नसती तर या राजकीय भेटीच्या चर्चेचा धुरळा रात्री उशिरापर्यंत छोट्या पडद्यावर उडाला असता.
मुंबई महापालिकेची सत्ता गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून शिवसेनेच्या हातात आहे. ही पालिका सर्वात श्रीमंत समजले जाते. केरळ राज्यापेक्षा मोठा अर्थसंकल्प या महापालिकेचा असतो आणि आहे.या वर्षीचा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 90 हजार कोटी रुपयांचा होता. पालिकेच्या या तिजोरीचे किल्ले उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. हे किल्ले त्यांच्याकडून काढून घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील आहे. मुंबई महापालिकेच्या विसर्जित सभागृहात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही सदस्य नव्हता. त्यापूर्वीच्या सभागृहात मात्र वीस च्या आसपास मनसेचे सदस्य संख्या होती. मुंबई महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जाणवण्याइतके उपद्रव मूल्य आहे. हे उपद्रव मूल्य कुणासाठी तारक तर कोणासाठी मारक ठरू शकते.
राज ठाकरेंची मुंबईतील अशी ताकद कोणालाही बेदखल करता येत नाही आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा टाळीसाठी राज ठाकरे यांच्याकडे हात पुढे केला आहे. त्यांना मुंबई महापालिकेवरची सत्ता येथून पुढेही अबाधित ठेवायची आहे. पण राज ठाकरे(politics ) यांनी युतीबद्दल संकेत देणारे कोणतेही पत्ते अजून पर्यंत खुले केलेले नाहीत. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्याकडूनही याबद्दल काही सुतोवाच केले गेलेले नाही. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हे हॉटेल ताज लँड मध्ये एकमेकांना भेटत होते तेव्हा संदीप देशपांडे, अमेय खोपकर हे दोघे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंत्री उदय सामंत यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर भेटावयास गेले होते. हा काही योगायोग नव्हे. तो सुद्धा”राज”योग असावा.
राज ठाकरे हे महायुतीत आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकतो. विशेषतः मुंबई महापालिका ताब्यात घेता येऊ शकते. असा “राज “कीय हिशोब करून हॉटेल आज लँड मध्ये
“राज”कारण झाले असावे. मुंबईतील मीडिया सतर्क नसता तर ही भेट गोपनीय राहिली असती.
इसवी सन 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. राजकीय भूकंप झाले. या सर्व राजकीय घडामोडी बद्दल मनसेच्या राज ठाकरे यांनी आपल्या कडवट प्रतिक्रिया दिल्या होत्या. या राजकारण्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही असे सुद्धा ते म्हणाले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चालले आहे तो”पोर खेळ”आहे असे त्यांना तेव्हा म्हणावयाचे होते.
तेव्हा सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया सुद्धा अशाच प्रकारच्या होत्या. उद्धव ठाकरे(politics ) हे महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतर आणि ते मुख्यमंत्री बनल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्यावर परखड टीका केली होती. आता गेल्या पंधरा दिवसापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र येणार, त्यांच्या दोन्ही पक्षांमध्ये युती होणार अशा चर्चा सुरू होत्या. आणि तसे वातावरणही तयार झाले होते. ठाकरे बंधूंच्या जवळच्या नातेवाईकांच्याकडून युतीचे प्रयत्न सुरू होते. त्याबद्दलची माहिती राज ठाकरे यांना नव्हती असे म्हणता येणार नाही. पण तरी त्यांनी युतीबद्दलचे स्पष्ट संकेत दिलेले नाहीत आणि नव्हते. मात्र असे वातावरण तयार झालेले असताना, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी झालेली अचानक ची भेट हा राजकीय “चोर खेळ’च म्हणावं लागेल.
हेही वाचा :
- कोल्हापूरात हातोडीचे घाव घालून प्रेयसीचा निर्घृण खून
- महिला ज्योतिषाच सहा महिन्यांपूर्वी केलेलं भाकितं ठरलं अचूक? अहमदाबाद अपघातानंतर ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल
- पालिका निवडणुकीचा मुहूर्त आणखी पुढे? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट