पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये मृतदेह आढळला, धक्कादायक घटना घडली, नेमकं काय घडलं?

पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पुण्यातील हॉटेलमध्ये एका उद्योजकाचा मृतदेह आढळून आला आहे. अशोक जैन असे मृत उद्योजकाचे नाव असून त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,(hotel) पुण्यात सॅलिसबरी पार्क परिसरातील उद्योजक अशोक मिलापचंद जैन (वय ६१) यांचा मृतदेह आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये शनिवार (ता. ९) रोजी दुपारच्या सुमारास आढळला. या घटनेची माहिती हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना देताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अशोक जैन घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. (hotel) त्यामुळे कुटुंबीयांनी शुक्रवारी सायंकाळी स्वारगेट पोलिसांकडे ‘मिसिंग’ची तक्रार नोंदवली होती. शनिवारी दुपारी ग्राहक खोलीचा दरवाजा उघडत नसल्याची माहिती हॉटेल कर्मचाऱ्यांनी डेक्कन पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खोली उघडली असता जैन मृतावस्थेत आढळले.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात मृत व्यक्तीने विषप्राशन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खोलीतील विविध ठिकाणी उलटी झाल्याचे आढळून आले असून, प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार वाटत आहे. (hotel) तसेच घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली असून,ती जैन यांनी लिहिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा…

कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?