आयपीएल खेळाडूंनी ठोठावले टीम इंडियाचे दार

जगभरातील क्रिकेटपटूंसाठी आपल्या राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्यासाठी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-20 क्रिकेट (t 20 cricket)स्पर्धा हे एक मोठे व्यासपीठ होय. या आयपीएलमधूनच टीम इंडियाला अनेक स्टार खेळाडू मिळाले आहेत. आता आयपीएलचा 17वा हंगामही संपला असून, या स्पर्धेत लक्ष्यवेधी कामगिरी करीत काही नव्या दमाच्या खेळाडूंनी टीम इंडियाचे दार ठोठावले आहे.

टी-20 क्रिकेट (t 20 cricket)वर्ल्ड कपनंतर हिंदुस्थानी संघ झिम्बाब्वे दौऱयावर जाणार आहे. वर्ल्ड कपनंतर वरिष्ठ खेळाडू नक्कीच विश्रांती घेणं पसंत करतील. अशा परिस्थितीत आयपीएलच्या अनपॅप्ड स्टार खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे. यात सनारायर्झ हैदराबादचा अभिषेक शर्मा, राजस्थान रॉयल्सचा रियान पराग, गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन व सनरायझर्स हैदराबादचा नितिश कुमार रेड्डी या खेळाडूंचा समावेश आहे. अभिषेक शर्माला फायनलमध्ये प्रभावी कामगिरी करता आली नसली, तरी आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यातही त्याचा मोठा वाटा होता. अभिषेकने यंदाच्या आयपीएलमध्ये 16 सामने खेळून 484 धावा केल्या आहेत.

त्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत. रियान परागने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना स्वतःला सिद्ध केले. त्याने यावर्षी 16 सामने खेळून 573 धावा केल्या आहेत. त्याने 4 अर्धशतके झळकावली. त्याची सरासरी 52.09 होती, तर त्याच्या बॅटमधून 149.21 च्या स्ट्राइक रेटने धावा आल्या. म्हणजेच हिंदुस्थानी संघासाठी त्याने आधीच आपला दावा मजबूत केला आहे. गुजरात टायटन्सकडून खेळणार्या साई सुदर्शनसाठीही हा मोसम चांगला होता. त्याने 12 सामने खेळून 527 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 47.91 आणि स्ट्राइक रेट 141.28 आहे. याचबरोबर हैदराबादच्या नितीश कुमार रेड्डीला आयपीएलमधील यंदाचा इमार्ंजग प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. तो एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि लवकरच त्यालाही हिंदुस्थानी संघात खेळण्याची संधी मिळू शकते.

हेही वाचा :

इचलकरंजीमध्ये नेत्याच्या विरोधात बोलणाऱ्याला धू धू धुतले

दिवाळीआधी राज्याला मिळणार नवं सरकार; ‘या’ तारखांना विधानसभेचं मतदान?

शाहरुखने गंभीरला दिला ब्लँक चेक! IPL ची ट्रॉफी जिंकण्याआधीच चेक देत म्हणाला…