दहावी परीक्षेचा (10th result)सांगली जिह्याचा निकाल 96.66 टक्के लागला. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वांधिक 97.89 टक्के आहे. यंदाही दहावीच्या निकालात पुन्हा मुलींनीच बाजी मारली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात 0.58 टक्क्याने वाढ झाली आहे. जिह्यातील 289 शाळांचा 100 टक्के निकाल लागला. कोल्हापूर विभागात सांगली जिल्हा तिसऱया क्रमांकावर राहिला आहे.
बहुसंख्य विद्यार्थ्यांनी निकाल मोबाईलवर पाहिला. काही भागांत नेट कॅफेमध्ये विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. निकालानंतर विद्यार्थ्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. विद्यार्थ्यांसह पालक निकालाची प्रिंट सोशल मीडियावर व्हायरल करीत होते. अनेकांनी स्टेटस ठेवला होता.(10th result)
गेल्या वर्षी सांगली जिह्याचा निकाल 96.08 टक्के लागला होता. यंदा 0.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिह्यात माध्यमिकच्या 652 शाळा आहेत. या शाळांतील 38 हजार 66 विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. त्यांपैकी 37 हजार 815 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यांपैकी 36 हजार 554 जण उत्तीर्ण झाले. केवळ एक हजार 262 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
बारावीच्या निकालानंतर आता दहावीच्या निकालातही मुलींचीच आघाडी आहे. 17 हजार 679 मुलींनी परीक्षेचा अर्ज भरला होता. त्यांपैकी 17 हजार 546 मुलींनी परीक्षा दिली. त्यामधून 17 हजार 176 मुली उत्तीर्ण झाल्या. त्याचे प्रमाण 97.89 टक्के आहे. जिह्यातील 20 हजार 387 मुलांनी परीक्षेचा अर्ज केला होता. त्यांपैकी 20 हजार 269 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यांपैकी 19 हजार 378 मुले उत्तीर्ण झाली. त्याचे प्रमाण 95.60 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 2.29 टक्क्यांनी जास्त आहे.
सांगली जिह्यातील 289 माध्यमिक शाळांचा दहावीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये वाळवा तालुक्यातील 40 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्यानंतर महापालिकाक्षेत्र 37, मिरज 34, जत 33, शिराळा 26, कडेगाव 22, विटा 24, पलूस 24, आटपाडी 20, कवठेमहांकाळ 16 आणि तासगाव तालुक्यातील 13 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
तालुकानिहाय निकाल ः
z कडेगाव 98.94 टक्के z पलूस 98.20 z शिराळा 98.17 z खानापूर 97.17 z आटपाडी 97.05 z वाळवा 96.77 z कवठेमहांकाळ 96.58 z तासगाव 96.47 z मिरज 96.41 z जत 96.13 z सांगली 95.46.
एकूण 96.66 टक्के
हेही वाचा :
सांगलीतील ३ कॅफे एकापाठोपाठ एक फोडले; शिवप्रतिष्ठान संघटना आक्रमक
‘आदित्य ठाकरेंचा हट्ट अन् मला मुख्यमंत्रीपद मिळालं’; फडणवीसांचा गौप्यस्फोट!
रोहित शर्मा आज मुंबईसाठी खेळणार शेवटचा सामना? Video Viral