‘मोदींच्या निरोप समारंभाची तयारी सुरू’, निकालाच्या पहिल्या कलानंतर संजय राऊतांची फटकेबाजी!

मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणी(Modi) केली जात आहे. एक्झिट पोलमध्ये यावेळी भाजपची एकहाती सत्ता येईल, असे भाकित वर्तवण्यात आले होते. प्रत्यक्ष मात्र सत्ताधारी एनडीए आणि विरोधी बाकावरील इंडिया आघाडी यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसतेय. यावरच आता उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधानक केले आहे.

नरेंद्र मोदी(Modi) हे वाराणसी मतदारसंघातून उभे आहेत. ते काशीपुत्र आहेत. तेथेदेखील नरेंद्र मोदी तीनवेळा पिछाडीवर आहेत. साधारण दोन वाजता चित्र स्पष्ट होईल. या क्षणी इंडिया आघाडी ही झपाट्याने पुढे जात आहे. एक्झिट पोलचे जे आकडे आले होते ते इंडिया आघाडीने पार केले आहेत.

इंडिया आघाडी खूप पुढे गेली आहे. माझ्या आकलनानुसार काँग्रेस पक्षाला 150 जागा मिळतील. ज्या काँग्रेस पक्षाला मागच्या निवडणुकीत 50 जागाही मिळाल्या नव्हत्या. तोच पक्ष आता 150 जागांच्या पुढे जाऊ शकेल असे मला वाटते.

काँग्रेसचं 150 जागांपर्यंत पोहोचणं म्हणजे मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं मी समजतो. जो आमचा अभ्यास आहे, त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे राहील आणि देशात इंडिया आघाडी 295 पेक्षा जास्त जागा जिंकेल. भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला बहुमत मिळेल असं मला दिसत नाही. पण यावर चर्चा करण्यासाठी अद्याप वेळ आहे.

हेही वाचा :

काँग्रेसला अच्छे दिन! तब्बल दहा वर्षांनी काँग्रेस तीन आकड्यांवर

शिवानी अग्रवालच्या अटकेने गुन्ह्याचे एक वर्तुळ पूर्ण….!

‘मोदी ‘भूतपूर्व’ झाल्यावर सरळ मार्गाने सत्ता सोडतील काय?’ ठाकरे गटाला वेगळीच शंका