सांगलीत विशाल पाटील आघाडीवर, निकालाआधीच कार्यर्त्यांनी जल्लोष करत उधळला गुलाल

लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ(politics) चांगलाच चर्चेत राहिला. या मतदारसंघातून कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंड पुकारत अपक्ष निवडणूक लढवली होती. हेच विशाल पाटील आघाडीवर आहेत. विशाल पाटील हे ३० हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील(politics) आघाडीवर आहेत. सहाव्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील ३० हजार ७०१ मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार विशाल पाटील हेच कायम आघाडीवर आहेत. भाजपचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीकडून निवणूक लढवलेले ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील हे देखील पिछाडीवर आहेत.

सातव्या फेरीमध्ये देखील विशाल पाटील यांची आघाडी कायम आहे. विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सांगलीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निकाल लागण्यापूर्वीच विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावून जल्लोष केला. सध्या सांगलीकरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आल्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती पूजा पाटील यांनीही मतमोजणी केंद्राबाहेर हजेरी लावली आहे. एकंदरीमध्येच सांगलीमध्ये आतापर्यंत जो कल समोर आला आहे त्यावरून विशाल पाटील हेच आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याची चर्चा सांगलीमध्ये सुरू आहे.

हेही वाचा :

काँग्रेसला अच्छे दिन! तब्बल दहा वर्षांनी काँग्रेस तीन आकड्यांवर

शिवानी अग्रवालच्या अटकेने गुन्ह्याचे एक वर्तुळ पूर्ण….!

‘मोदी ‘भूतपूर्व’ झाल्यावर सरळ मार्गाने सत्ता सोडतील काय?’ ठाकरे गटाला वेगळीच शंका