बॉलिवूडची ‘दबंग’ स्टार अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज लग्नबंधनात(wedding) अडकणार आहे. आज सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत रजिस्टर मॅरेज करणार आहे. सोनाक्षी आणि झहीर यांना इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनाक्षी आणि जहीर गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना(wedding) डेट करीत आहेत. हे आज रजिस्टर मॅरेज करणार असून संध्याकाळी संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी रिसेप्शन पार्टी ठेवणार आहेत. अशातच सोशल मीडियावर सोनाक्षी कोणता लूक कॅरी करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.
सोनाक्षी-झहीर लग्नामध्ये कोणते आऊटफिट्स करणार, याची जोरदार चर्चा सुरु आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफरने याबद्दलचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नाच्या आदल्या दिवशी सोनाक्षीच्या ‘रामायण’ बंगल्याच्या बाहेरुन कारमधून लग्नाचे कपडे येताना स्पॉट झाले आहेत. रिसेप्शनसाठी सोनाक्षी पिच कलरचा घागरा वेअर करणार आहे. ओढणी आणि घागरा वेअर करणार असल्याचे कळत आहे. यावेळी आणखी काही आऊटफिट्सही पाहायला मिळत आहे.
विरल भयानीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, सोनाक्षी सिन्हा आई आणि वडिलांसोबत मिळून लग्नाच्या अगोदर पूजा करताना दिसली.. सध्या हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत आहे. सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाबद्दल कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.
लग्नानंतर सोनाक्षी-जहीर, या जोडप्याचा पहिला फोटो, पहिली झलक पाहण्यासाठी सर्वच आतुर आहेत. वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी लग्नाला जाणार नाही, असं सांगितलं होतं. पण आता रजिस्टर मॅरेजसाठी सोनाक्षीचे आई- वडील पण उपस्थिती लावणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मुंबईतील दादर येथील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी होणार आहे. शिल्पा शेट्टीच्या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. लग्नासाठी हेमा कुरेशी, हनी सिंग, सलमान खान, हिरामंडी वेबसीरीजची स्टारकास्ट रिसेप्शनला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. या रिसेप्शन पार्टीमध्ये बॉलिवूडमधील आणखी कोणकोणते सेलिब्रिटी उपस्थिती लावणार हे पाहणं औत्सुतक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा :
इचलकरंजी येथे विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू
CM शिंदेंच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप, सुषमा अंधारेंचे खळबळजनक आरोप : Video
धोनी, विराट अन् रोहित एकत्र लागले नाचायला, पंत रिल शेअर करत म्हणाला…