माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निकालांनी राजकीय (political) समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलली आहे.एकीकडे लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर महायुतीत खटक्यावर खटके उडत असतानाच आता पंढरपूरमध्येही अशीच राजकीय तानातानी पाहायला मिळाली. आरोग्यमंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते तानाजी सावंत आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपली.
पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या 200 बेड विस्तारीत इमारतीचे भूमिपूजन सोमवारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमावर भाजप आमदार समाधान आवताडे यांनी तीव्र आक्षेप घेतला. यामुळे पंढरपूरच्या राजकीय (political) वर्तुळात नवा पेटण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि पंढरपूरचे भाजप आमदार समाधान आवताडे यांच्यासह माजी आमदारांची निमंत्रण पत्रिकेत नावेही छापण्यात आली होती.परंतु,आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचा कार्यक्रम भाजपचे आमदार समाधान आवताडे,माजी आमदार प्रशांत परिचारक व इतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ठरविण्यात आरोप आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर करण्यात आला आहे.
भाजप पदाधिकारी काय म्हणाला..?
माजी आमदार (political) प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख यांनी कार्यक्रम सुरु असतानाच आरोग्य विभागाने भाजपच्या आजी-माजी आमदारांना विश्वासात न घेता कार्यक्रम ठरविल्याचा थेट आरोप केला. ते म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीमध्ये विस्तारीकरणाच्या कामात भाजपच्या आजी माजी आमदारांचा मोठा वाटा आहे. असे असतानाही त्यांना विश्वासात न घेता कार्यक्रम घेतला आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पत्रिकेत नाव टाकले नाही. त्यांचा तो अपमान असल्याची टीका त्यांनी केली.
यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, पत्रिका छापण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडे असते, प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी पत्रिका छापली आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या मतदारसंघातील हा कार्यक्रम आहे. त्यांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहायला पाहिजे होते. लोकांच्या हितासाठी घेतलेला ध्यास याला जर कोणी नख लावण्याचा काम करत असेल तर त्याचाही मी याच व्यासपीठावरुन सर्वांच्या साक्षीने निषेध करतो.
हेही वाचा :
वेस्ट इंडिजचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न काही क्षणात भंगलं
काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखविले काळे झेंडे
मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी…’ के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला!