समुद्रात सर्फिंग करताना प्रसिद्ध सर्फर, हॉलिवूड (hollywood)अभिनेता तमायो पेरी याचं शार्कने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
शार्कच्या हल्ल्यात जखमी झाला होता तमायो पेरी
अभिनेता तमायो पेरी याच्या मृत्यूचे वृत्त दिले आहे. 23 जून रोजी शार्कच्या हल्ल्यानंतर तामायो पेरी याला होनोलुलू मधील रुग्णालयात आपत्कालीन स्थितीत दाखल करण्यात आले होते. तमायो पेरी हा समुद्री सुरक्षा रक्षक आणि सर्फिंग प्रशिक्षकासोबत गोट बेटावर होता. तमायोने सुरक्षेबाबतची सगळी काळजी घेतली असतानाही शार्कने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृ्त्तानुसार, तमायोने वयाच्या 12 व्या वर्षी सर्फिंगला सुरुवात केली होती. होनोलुलू एर्मजन्सी सर्व्हिस डिपोर्टमेंटचे अधिकारी शायनी एनराईट यांनी सांगितले की, जुलै 2016 मध्ये तमायोने त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. मागील काही वर्षांपासून तमायो या ठिकाणी काम करत होता. त्याशिवाय, हॉलिवूड चित्रपटातही काम करत होता. तमायोने पायरेट्स ऑफ द कॅरेबियनशिवाय, ब्लू क्रश सारख्या चित्रपटात काम केले आहे.
हेही वाचा
CM शिंदेंची मागितली खोली,खासदार होताच कंगनाची मोठी मागणी!
आज अंगारक संकष्ट चतुर्थी! बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
NIA मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; किती मिळेल पगार..