अभिनेत्री आणि नवनिर्वाचीत खासदार कंगना राणावतने महाराष्ट्र सदनाकडे एक अजब मागणी केली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Minister)यांचा सूट (प्रशस्त खोली) मागितला आहे. रूम छोट्या असल्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांची रूम मिळावी, अशी मागणी कंगनाने केली आहे. महाराष्ट्र सदनातून कंगनाने महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला फोन केल्याची सुत्रांची माहिती आहे
मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्यूट दिला जाणार नाही, असे महाराष्ट्र सदनाने स्पष्ट केले आहे. कंगना म्हणाली, “महाराष्ट्र सदन सर्वात सुंदर आहे. माझे काही मित्र इथे आहेत. महाराष्ट्र माझं घर आहे.”
दरम्यान, कंगनाच्या या मागणीवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. “श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी. हिमाचल भवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजीना मिळत असेल तर काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत राहत आहेत श्रीमतीजी,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
कंगनाच्या या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काहींनी तिच्या मागणीचे समर्थन केले तर काहींनी ती मागणी अवास्तव असल्याचे म्हटले. महाराष्ट्र सदनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला असून त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही व्यक्तीस मुख्यमंत्री स्यूट देणे शक्य नाही
हेही वाचा
आजचे राशी भविष्य (25-06-2024) :horoscope Today
आज अंगारक संकष्ट चतुर्थी! बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
NIA मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; किती मिळेल पगार..