नांदगाव पोलिसांनी सोमवारी गुटखा आणि गांजा सदृश्य वस्तू सापडल्याचा(dark matter) दावा केला. याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शहरात पोलिस विरुद्ध शिवसेना असे वातावरण आहे. शिवसेना नांदगाव तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांच्या विरोधात सोमवारी पोलिसांनी गांजा आढळल्याचा गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. त्यामूळे शहरात हा चर्चेचा विषय ठरला.
हा गुन्हा खोटा आहे. पोलिसांनी जाणीवपूर्वक त्रास(dark matter) देण्यासाठी हा प्रकार केला आहे. हे राजकीय षडयंत्र आहे. असा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आज शहर बंद करण्यात आले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते गुप्ता यांचे शनी मंदिर परिसरात दुकान आहे. या दुकानात पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन आणि तालुका न्याय दंडाधिकारी सुनील सैंदाणे यांच्या पथकाने तेथे छापा टाकला. यावेळी आठ किलो गांजा कागदात गुंडाळलेल्या स्वरूपात सापडला असा दावा पोलिसांनी केला आहे. विमल गुटखा देखील यावेळी जप्त करण्यात आला.
ही घटना घडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. यावेळी पोलिस आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाच्या तरी सांगण्यावरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहे.
गुप्ता हे प्रामाणिक व्यापारी असून गेली 25 वर्ष ते व्यवसाय करतात. त्यांना अडकवण्यासाठी कोणतीही शहानिशा व चौकशी न करता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी रात्री शहर बंद ठेवण्याचे एसएमएस करण्यात आले होते.
शहरात ठीक ठिकाणी फलकही लावण्यात आले होते. आज बाजारपेठ बंद राहिल्याने शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन अधिक जोमाने सुरू झाले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि फुटीर नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते गणेश धात्रक यांनी सांगितले.
हेही वाचा :
कळंबा कारागृहात कैद्याचा तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला
ज्येष्ठांना अटक न करण्याची तरतूद फसवी की आश्वासक…..?
कोल्हापूर : पाकिटातील नाव बदललं अन् सभापतिपद हुकलं; वडिलांची कसर काढली मुलाने भरून