ब्रेकिंग! चंद्रकांत पाटील यांनी मोठ्ठी कॅडबरी देत घेतली उद्धव ठाकरेंची भेट

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे(politics). अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरेगटप्रमुख उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात दाखल झाले. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत करत चॉकलेट भेट दिले. उद्धव ठाकरे यांच्यासह अंबादास दानवे आणि अनिल परबही यावेळी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात (politics)उध्दव ठाकरे आणि दानवेंची भेट घेतली. यावेळी या नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली. त्यावेळी अनिल परब देखील उपस्थित होते. हि भेट कोणत्या कारणासाठी घेतली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यावेळी चंद्रकांत पाटलांनी पेढा देखील भवरला.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरेगटप्रमुख उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात दाखल झाले. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत करत चॉकलेट भेट दिले. उद्धव ठाकरे यांच्यासह अंबादास दानवे आणि अनिल परबही यावेळी उपस्थित होते.

विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचीही विधानभवन परिसरात भेट झाली. देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. अनेक वर्षांनंतर जुने सहकारी एकत्र आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा :

आता मात्र “हद्द”च झाली! पुनश्च हरी ओम…..?

कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; ३०० हून अधिक ग्रामस्थांना लागण

विवाहबाह्य संबध ठेवल्याचा आरोप लावत महिलेला जमावाची काठीने मारहाण