टीम इंडियाच्या विजय रॅलीसाठी गुजरातवरून(targets) बस मागवण्यात आल्यामुळे विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारसोबतच महाराष्ट्र सरकारवरही कडवट निशाणा साधला आहे.
गुजरातवरून बस मागवण्याचा वाद
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीच महाराष्ट्राचा(targets)अवमान केल्याची टीका केली होती. आता संजय राऊत यांनी मोदी सरकारवर सवाल उठवला आहे. ‘गुजरातवरून बस पाठवून महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न आहे’, असा आरोप त्यांनी केला आहे.
संजय राऊतांचा आरोप
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी विचारलं, ‘खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे असं तुम्ही दाखवत आहात का?’ तसेच, ‘मुंबईचा पैसा लुटून गुजरातला घेऊन जात आहेत’, अशी टीका त्यांनी केली आहे.
मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना सांगितलं की, ‘पंतप्रधान भारतीय क्रिकेट टीमला भेटण्यासाठी वेळ काढतात, पण जिथे लोकं संकटात आहेत तिथे ते जात नाहीत. मणिपूर, हाथरससारख्या ठिकाणी पीएम मोदी जात नाहीत. भारतीय टीमला भेटण्यासाठी त्यांना वेळ आहे, पण ज्या राज्यातून ते जिंकून आले आहेत, त्या राज्यात मोठी दुर्घटना घडली तरी देखील तिकडे जात नाहीत.’
मुंबईतल्या संसाधनांचा वापर का नाही?
संजय राऊत यांनी सांगितलं की, ‘मुंबईत बेस्टच्या बसेस आहेत. महाराष्ट्र सर्वात मोठे औद्योगिक राज्य आहे. मुंबईत सर्वकाही आहे. आमच्याकडूनच तुम्ही शिकला ना?’ त्यांनी विचारलं की, ‘गुजरातवरून बस आणण्यावर क्रिकेट असोसिएशनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजे होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारणीवरती अनेक मराठी लोकं आहेत. त्यांनी आक्षेप घेतला पाहिजे होता.’
टीम इंडियाच्या विजय रॅलीसाठी गुजरातवरून बस मागवण्यात आल्यामुळे संजय राऊतांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी हा निर्णय महाराष्ट्राच्या अवमानाचा आहे, असा आरोप केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे.
हेही वाचा :
इथे हतबल ठरतो आहे, जादूटोणा प्रतिबंधक कायदा!
तंटा नाय तर घंटा नाय… ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो आऊट
बहीण लाडकी मग भावाचं काय? लाडक्या जावई, दाजीचं पण बघा! कोल्हापूरच्या रांगडी…