ईश्वरपूर येथे नातेवाईकांकडे आलेल्या आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वप्निल संताजी देवकर (वय 30, मूळ रा. काळमवाडी, ता. वाळवा) आणि (Ishwarpur) त्याला मदत करणाऱ्या मेघा विजय वाघमारे (वय 40, मूळ रा. सातारा) या दोघांना ईश्वरपूर पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिला कार्यक्रमानिमित्त ईश्वरपूर येथे नातेवाईकांकडे आली होती. ती आठ महिन्यांची गर्भवती आहे. हे माहीत असतानादेखील संशयित स्वप्निल याने 22 आणि 27 एप्रिल रोजी तिच्यावर अत्याचार केला. या कृत्यात मेघा वाघमारे हिने त्याला मदत केली. (Ishwarpur) हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या पतीला जीवे मारू, अशी धमकीही संशयितांनी पीडितेला दिली होती.
पीडिता सासरी गेल्यानंतर तिने पतीला हा प्रकार सांगितला. (Ishwarpur) त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. हा गुन्हा ईश्वरपूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी दोन्ही संशयितांना अटक केली. शुक्रवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने स्वप्निल देवकर याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, तर मेघा वाघमारे हिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
हेही वाचा
राष्ट्रवादीला मोठा धक्का, या बड्या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा
पलटण सूड घेणार की ‘किंग्ज’ मैदान मारणार? पहा धर्मशाळाचा पीच रिपोर्ट
सांगली फाटा उड्डाणपुलावर अपघात रिक्षाचा चक्काचूर, महामार्गावर 4 तास वाहतूक कोंडी