राज्यात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची(Yojana) जोरदार चर्चा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून महिलांकडून फॉर्म भरण्याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. नारीशक्ती योजना दूत या ॲपच्या माध्यमातूनही अर्ज करता येतो. अर्ज कसा करावा, त्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स आहेत, हे सविस्तर जाणून घेऊयात.
अर्ज करण्याच्या स्टेप्स:
१. नारीशक्ती योजना(Yojana) दूत ॲप डाउनलोड करा.
२. ॲप डाउनलोड केल्यानंतर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्या.
३. नारीशक्तीचा प्रकार निवडा: स्वतः फॉर्म भरत असाल तर स्वतः करावा, किंवा अन्य पर्याय निवडावा.
४. ॲपमध्ये सर्वात खाली ४ मेनू दिसतील. त्यापैकी पहिला मेनू ‘नारीशक्ती दूत’ वर क्लिक करा.
५. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या ऑप्शनवर क्लिक करा.
६.फॉर्म उघडल्यानंतर संपूर्ण माहिती भरून घ्या.
फॉर्ममध्ये आवश्यक माहिती:
१. जन्माचे ठिकाण: ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण, जिल्हा, गाव/शहर, ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका.
२. अधिवास/जन्म प्रमाणपत्र: TC/जन्म प्रमाणपत्र (शासन निर्णयाच्या सुधारित आदेशानुसार).
३. उत्पन्न प्रमाणपत्र: उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड.
४. हमीपत्र, बँक पासबुक, सध्याचा LIVE फोटो.
५. वरील सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करा.
६. Accept करा आणि ‘माहिती जतन करा’ वर क्लिक करा.
७. मोबाईलवर आलेला ४ अंकी OTP टाका.
८. फॉर्म सबमिट करा.
अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी:
१. केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करा.
२. अर्जाची स्थिती Scheme: pending मध्ये दिसेल.
या सोप्या स्टेप्स फॉलो करून महिला स्वतःहून आपला फॉर्म भरू शकतात. मात्र शासनाच्या काही अटी आणि नियमांमुळे महिलांची धांदल उडालेली आहे. सरकारने या प्रक्रियेत सुसूत्रता आणून महिलांची मदत करणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
पंढरपुरात राजकीय वातावरण तापलं! राहुल गांधी-शरद पवारांना…
‘…तर होणाऱ्या मृत्यूंची जबाबदारी तू घेणार का?’ अभिनेत्री सामंथाला बॅटमिंटनपटूने झापलं
महाराष्ट्रात खळबळ! पत्नीची निर्घृण हत्या आणि पतीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत